World Population Day : भारत म्हातारा होतोय का? लोकसंख्येच्या अभ्यासातून समोर आली ही भीती

World Polpulation Day In Marathi : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकलं आहे.
World Population Day
World Population Dayesakal

Is Indian getting old : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे आता भारत हा जगातला क्रमांक एकचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. २०२३ च्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाखांवर जाईल. तर चीनची लोकसंख्या १४२ कोटी ५७ लाख असू शकते. २०११ नंतर जनगणना न झाल्याने भारताची लोकसंख्या नेमकी किती याची ठोस माहिती उपलब्ध नाही.

पण घटलेला मृत्यूदर आणि वाढलेले आयुर्मान यामुळे भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. त्यामुळे भारतात वृद्धांची संख्याही वाढणार अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे देशाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार, जाणून घेऊया.

पायाभूत सुविधांवर ताण

वाढत्या लोकसंख्येमुळे निवारा, वाहतुक, आरोग्य आणि शिक्षण सुविधांशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची गरज भासणार. मोठ्या लोकसंख्येच्या आवश्यकता पूर्ण करणे अवघड होतं.

संसाधनांवर ताण

लोकसंख्येचा सर्वाधिक ताण हा नैसर्गिक संसाधनांवर येतो. यात जमीन, पाणी, जंगल आणि खनिज यांचा समावेश असतो. वाढलेल्या लोकसंख्येमुळे याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होतो. पर्यायाने याचा परिणाम पाण्याची उपलब्धता, कृषी उत्पादकता आणि सर्वच पर्यावरणावर दिसून येतो.

World Population Day
World Population Day: पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा झाला ?

दारिद्र्य आणि विषमता

वाढत्या लोकसंख्येमुळे संसाधन, सोयीसुविधा, उत्पन्न यांच्या कमतरतेमुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लोकांच्या उत्पन्नात फरक दिसू शकतो. त्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी विशेष पर्यत्न करावे लागतील. एकूणच लोकांच्या जीवनशैलीचा स्तर, आरोग्य आणि शिक्षण यांची सांगड घालण्यात विषमता दिसू शकते.

बेरोजगारी

लोकसंख्या वाढली की, त्यांना एवढ्या मोठ्याप्रमाणात रोजगार देणार कुठून हापण प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रोजगार निर्मिती हे मोठे आव्हान ठरणार आहे. आज बेरोजगारी हा भारतासाठी सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न झाला आहे. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही समस्या विक्राळ रुप घेऊ शकते.

World Population Day
२०२२ मध्ये जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्या पार | World Population

कौशल्य विकास, शिक्षण

मोठ्या लोकसंख्येच्या देशाच शिक्षण आणि कौशल्य विकास हा मुद्दाही आव्हानात्मक ठरतो. लोकसंख्येच्या प्रमाणात लोकांना सुशिक्षीत बनवणे, कुशल बनवणे आवश्यक असले तरी त्याला पुरे पडणे हा प्रश्न असतो. याचा थेट परिणाम शिक्षणाच्या दर्जावरही आहे.

पर्यावरणीय आव्हाने

वाढत्या लोकसंख्येमुळे त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर दिसून येतो. जंगलतोड, वायू प्रदुषण आणि जल प्रदुषण या समस्यांमुळे पर्यावरणाचं संरक्षण आव्हानात्मक ठरू शकते.

सामाजिक आव्हाने

वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजनशुन्य शहरीकरण आणि विषमता यांच्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे गुन्हेगारीचे आव्हान मोठे ठरू शकते. कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होतात.

वृद्धांचे वाढते प्रमाण

भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या सुमारे ४० टक्के आहे. तर देशात सुमारे निम्म्या लोकसंख्येचं वय हे २५ ते ६४ वर्षे दरम्यान आहे. भारतात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींची संख्या केवळ ७ टक्के आहे. भारतातील लोकसंख्या वृद्धी दर कमी होत असल्याने त्याबाबत चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांत वयोवृद्ध लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार भारताचे सरासरी वय २८ वर्ष आहे. पुढील ३० वर्षांत वयोवृद्ध लोकांची संख्य़ा वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही वर्षांत वृद्धांची संख्या वाढत जाईल. वृद्धांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी काही सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com