World's Biggest Roti : अबब ! 145 किलोची चपाती, जगातली सर्वात मोठी चपाती भारतातल्या या शहरात

जगातली सर्वात मोठी चपाती बनवण्याचं रेकॉर्ड भारतातल्या या शहराने केलं आहे.
World's Biggest Roti
World's Biggest Rotiesakal

Ginij Book Of World Record For World's Biggest Roti : भारताची खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. इथे प्रत्येक काही किलोमीटरवर जेवणाची चव आणि त्याची बनवण्याची पद्धत बदलते. शिवाय त्यांचा आकारपण वेगवेगळा असतो. पण संपूर्ण भारतात फक्त एक जागा अशी आहे जिथे जगातली सर्वात मोठी चपाती बनवली जाते. ही चपाती एवढी मोठी असते की, त्याने संपूर्ण गावाचं पोट भरू शकतं. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. जाणून घेऊया याची अनोखी कहाणी.

कुठे बनते जगातली सर्वात मोठी चपाती?

जगातली सर्वात मोठी अजून दुसरीकडे कुठे नाही तर पंतप्रधान मोदींचे मूळ राज्य गुजरातच्या जामनगर इथे बनते. ही चपाती अर्थात रोज बनवली जात नाही. काही खास प्रसंगी बनवण्यात येते. उदाहरणार्थ दगडूशेठ गणपती सार्वजनिक महोत्सव किंवा जलाराम बापा जयंती अशा दिवशी ही चपाती बनते. जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धीर कमीटीद्वारा ही चपाती बनवली जाते. मग ही चपाती मंदिरात येणाऱ्या लोकांना दिली जाते. लोक ही चपाती खायला दूर दूरवरून येतात.

World's Biggest Roti
Video Viral: चोरबाजारला भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी युट्युबरला मारहाण, दुकानदारावर गुन्हा दाखल

एवढी मोठी चपाती बनवतात कशी?

ही चपाती बनवायला एखाद दुसरी नाही तर भरपूर महिला कामाला लागतात. ही चपाती बनवायला काही तास लागतात. यासाठी भरपूर गव्हाचे पिठ लागते. चपाती बनून तयार झाली की, तिचं वजन १४५ किलो असतं. मंदिराजवळ ही चपाती बनवण्यासाठी एक विशेष तवा आहे. शिवाय चपाती भाजायलाही अनेक लोक लागतात. यावेळी चपाती करपू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com