Video Viral: चोरबाजारला भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी युट्युबरला मारहाण, दुकानदारावर गुन्हा दाखल

लोक युट्युबरसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
Dutch YouTuber Pedro Mota
Dutch YouTuber Pedro MotaSakal

Dutch YouTuber Pedro Mota: दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. अनेक लोक त्यांना पाहुणे समजून त्यांना मदत करतात, तर अनेक लोक त्यांना लुटतात आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतात. असाच एक प्रकार बेंगळुरूमधील चोरबाजारमधून समोर आला आहे.

जिथे शॉपिंग आणि व्लॉग रेकॉर्ड करण्यासाठी आलेल्या एका डच यूट्यूबर सोबत स्थानिक दुकानदाराने गैरवर्तन केले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ युट्युबरने त्याच्या Madly Rover चॅनलवर शेअर केला आहे.

बाजाराच्या मध्यभागी दुकानदाराने Youtuber सोबत केले गैरवर्तन

व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की यूट्यूबर रविवारी बेंगळुरूमधील चिकपेट मार्केटमध्ये फिरायला आणि खरेदीसाठी जातो. जिथे तो दुकानात उभा राहून वस्तूंची पाहणी करताना दिसतो.

यानंतर तो बाजारातील रस्त्यांवर फिरतो आणि चोर बाजारातील दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. त्यानंतर अचानक युट्युबरची एका व्यक्तीशी टक्कर होते.

युट्युबर त्या व्यक्तीला नमस्कार सर म्हणतो, पण ती व्यक्ती रागाने त्याचा हात धरतो आणि म्हणू लागतो की हे काय आहे, हे काय आहे.

ती व्यक्ती युट्युबरला हातवारे करत विचारते, तू दारूच्या नशेत आहेस का? आणि त्याच्याशी गैरवर्तन करतो त्यानंतर युट्युबर हात सोडवून तिथून पळून जातो. (Dutch vlogger physically assaulted, harassed in Bengaluru; Case Registered Video goes viral)

Dutch YouTuber Pedro Mota
CoWIN Data Leak: धक्कादायक! Cowin पोर्टलवरून डेटा लीक? करोडो लोकांची खाजगी माहिती टेलिग्रामवर

व्यक्तीवर गुन्हा दाखल:

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यानंतर लोक युट्युबरसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

परदेशी पेड्रो मोटा यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीच्या संदर्भात, नवाब हयाथ शरीफ या व्यक्तीविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Dutch YouTuber Pedro Mota
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com