योग संस्था, जीम उद्यापासून सुरू; परंतु....

Yoga-Gym
Yoga-Gym

नवी दिल्ली - अनलॉकडाउनच्या ताज्या टप्प्यामध्ये बुधवारपासून (ता. ५) योग संस्था आणि जीम सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सहा फुटाचे अंतर, मास्क आवश्यक असेल. विशेष म्हणजे आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक असेल. प्रतिबंधित क्षेत्रातील जीम, योग केंद्रे मात्र बंद राहतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. तसेच ३८ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्तांनी प्राण गमावले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने आज जीम आणि योग केंद्रे सुरू करण्याबाबतच्या जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्राच्या तसेच राज्यांच्या नियमावलीचे बालन करणे बंधनकारक असेल. 

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

  • प्रतिबंधित क्षेत्रातील जीम, योगकेंद्रे बंद राहतील. 
  • ज्येष्ठ, गर्भवती, गंभीर आजाराचे रुग्ण, दहा वर्षांखालील मुले यांना जीमला जाण्यास बंदी
  • सुरक्षेसाठी कमीत कमी सहा फुटाचे अंतर राखणे
  • परिसरात फेसमास्क आवश्यक
  • व्यायाम करताना एन-९५ मास्कचा वापर टाळावा.
  • परिसरात थुंकल्यास कारवाई 
  • आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे सदस्यांना बंधनकारक
  • जीम अथवा योग केंद्राच्या बाहेर जागा असल्यास उपकरणे मोकळ्या जागेत ठेवावीत. 
  • प्रवेश आणि बहिर्गमनाचे मार्ग वेगवेगळे असावे. 
  • आर्थिक व्यवहारांसाठी संपर्करहीत व्यवस्थेचा वापर करावा. 
  • तापमान २४-३० अंश सेल्शिअसदरम्यान असावे. 
  • योग केंद्रे, जीममधील कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवावी. 

मुंबई पुन्हा गजबजणार
मुंबई - कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर सुमारे पावणे चार महिन्यांनंतर मुंबईतील सर्व दुकाने सुरू करण्याची महापालिकेने परवानगी दिली आहे. मिशन बिगेन अगेनअंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार मॉलही सुरू होणार आहेत. उद्योग, व्यावसायिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक राजधानीचा जुना उत्साह पुन्हा दिसणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी नवे आदेश दिले.

"मिशन बिगेन अगेन'' सुरू करताना आतापर्यंत रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एक दिवसाआड सुरू करण्याची परवानगी होती. आता त्यात मोठा बदल केला आहे. नवीन आदेशानुसार मंगळवारपासून (ता.४) दोन्ही बाजूची दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. मात्र, दुकानांमध्ये एकाच वेळी पाचपेक्षा जास्त ग्राहाकांना प्रवेश देता येणार नाही. नियमाचे उल्लंघन झाल्यास मालकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. मॉल बुधवार (ता.५) पासून सुरू होणार आहेत. सांघिक खेळांव्यतिरिक्त इतर खेळांना परवानगी दिली आहे.

यात गोल्फ, तिरंदाजी, जिमनॅस्टिक, टेनिस, बॅटमिंटन, मल्लखांब अशा खेळांचा समावेश आहे. यात सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. टॅक्‍सी, ऍपवर आधारित टॅक्‍सी, खासगी चार चाकी यात चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे. रिक्षामधून दोन प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र या वाहनांतून फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

कर्मचारी उपस्थितीबाबत बंधन नाही
कोरोना संकट अधिक गडद होऊ नये म्हणून आतापर्यंत कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. नव्या नियमावलीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा बंधनांचा समावेश नाही. तरीही घरून काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

दुकानांसाठी नियम
-दुकानात फक्त पाच ग्राहकांना प्रवेश
-कोविड-१९ प्रतिबंधक उपाय बंधनकारक
-सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत दुकाने सुरू ठेवावीत

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com