PM Modi: "तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही"; राज्यसभेत मोदी विरुद्ध खर्गे कलगीतुरा, पंतप्रधान मोदी संतापले

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करत होते. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले.
PM Modi
PM ModiEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला आणि काँग्रेस पक्ष कालबाह्य झाल्याचे म्हटले. विरोधकांनी व्यत्यय आणण्यास सुरुवात केल्याने पंतप्रधान मोदी म्हणाले की पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जायचा... आजही तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आला आहात. पण. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करत होते. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना विरोधकांनी गोंधळ केला. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाहीस. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे".

PM Modi
Loksabha Election 2024: मिथुन चक्रवर्ती विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा... पश्चिम बंगालच्या लोकसभा या जागेवर दोन स्टार्समध्ये राजकीय संघर्ष?

आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. मी आदरपूर्वक त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि चर्चा अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सर्व आदरणीय सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

PM Modi
Uniform Civil Code : दुसऱ्या लग्नापासून घटस्फोटापर्यंत... मुस्लिम समाजाच्या UCCबद्दल अडचणी काय आहेत? जाणून घ्या

पुढे मोदी म्हणाले की, मी त्या दिवशी हे सांगू शकलो नाही, पण मी खर्गेजींचे विशेष आभार मानतो. मी खूप लक्ष देऊन ऐकत होतो. लोकसभेतील करमणुकीची उणीव तुम्ही पूर्ण केली, असे मोदींनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

'आजही तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आला आहात. पण. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. देशातील जनतेने हा आवाज बळकट केला आहे... मीही या वेळी तयार आलो आहे...', असंही मोदी म्हणाले.

PM Modi
PM Modi :दुसऱ्या ‘भारत ऊर्जा सप्ताहा’चे उद्‍घाटन; ऊर्जा क्षेत्रात घडविणार क्रांती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com