Viral Video : खतरों के खिलाडी! चक्क ११ हजार वोल्टच्या विजेच्या तारांवर घेतोय झोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shocking Electric Video

Viral Video : खतरों के खिलाडी! चक्क ११ हजार वोल्टच्या विजेच्या तारांवर घेतोय झोका

Shocking Electric Video: सोशल मीडियावर हल्ली अनेक आश्चर्यजनक व्हिडिओज व्हायरल होत असतात. असाच एक अंगाला शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरं तर या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळच घातलाय. कारण या व्हिडिओमध्ये एक मुलगा चक्क विजेच्या तारांवर चालताना दिसतोय. वीजेच्या तारांकडे बघताच आपल्याला कायम करंट लागण्याची भीती वाटत असते. मात्र व्हिडीओमधील हा पठ्ठा तुम्हाला आरामात वीजेच्या तारांना दोरीप्रमाणे पकडत त्यावर झोके घेताना दिसेल.

वीजेचे कनेक्शन्स असलेल्या ठिकाणी धोका आहे असं सांगणारं लाल भडक चिन्ह तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. लोक अनेकदा वीजेच्या खांबाखाली उभे राहायला देखील घाबरतात. मात्र या पठ्ठ्याच्या हिमतीची दादच द्यावी लागेल. कारण कसलीही भीती न बाळगता या मुलाने थेट विजेच्या खांबावर चढण्याचं धाडस केलंय.

हे धाडस करत असताना काहींनी त्याचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ बघणाऱ्यांनाही वीजेच्या शॉकप्रमाणेच शॉक बसला आहे. अनेकांना तर हा व्हिडिओ बघताना या मुलाला काही होणार तर नाही ना, विजेचा झटका तर बसणार नाही ना असेही विचार येऊ लागले होते.

व्हि़डिओतील मुलगा चक्क ११ हजार वोल्टच्या हायटेंशन लाईन्स पकडून स्वत:च्याच धुंदीत तारेवर झुलताना दिसतोय. हा व्हिडिओ बघणारे तर हैराणच झालेत. कारण या मुलाच्या चेहऱ्यावर भीतीच्या रेषाही उमटलेल्या दिसत नव्हत्या. मात्र हे धक्कादायक प्रकार बघणाऱ्यांनी या प्रकरणाबाबत लगेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवलं आणि कृपया वीजेचा प्रवाह सुरू करू नका अशी विनंतीही केली.

व्हायरल व्हिडिओतील मुलाचं नाव नौशाद असं आहे. बांगडीची हातगाडी लावणारा हा तरून अचानक त्याची हातगाडी बाजूला सोडून छतासमोरील विजेच्या तारांवर चढला. यावेळी नेमका पाऊस असल्या कारणाने या भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे हा मुलगा थोडक्यात बचावला.

हेही वाचा: Viral Ad: चक्क गर्लफ्रेंड होण्याचे मिळतील महिन्याला दोन लाख रुपये!

नौशादच्या या असामान्य वागण्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. त्याला कसेबसे लोकांनी खाली उतरवून त्याच्या कुटुंबियांना या धक्कादायक प्रकरणाची माहिती दिली. त्याला याआधी असे विचित्र वागताना कोणीही बघितले नव्हते. त्यामुळे त्याच्याकडून पहिल्यांदाच झालेल्या या विचित्र वागणुकीचं सगळेच आश्चर्य करत होते. त्यामुळे तो अचानक असं विचित्र का वागला असावा असा प्रश्नही यावेळी अनेकांना पडला.