तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार; डेटिंग ॲपवरून झाली होती ओळख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Young woman tortured in hotel

तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार; डेटिंग ॲपवरून झाली होती ओळख

नवी दिल्ली : दिल्लीतील द्वारका येथील पाच मजली हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार (tortured) झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने डेटिंग ॲपवर मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Young woman tortured in hotel)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणी पश्चिम दिल्लीत राहते. ती एका शोरूममध्ये काम करते. हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये राहणाऱ्या तरुणाने डेटिंग ॲपवर तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकमेकांशी मोबाईलवर बोलू लागले. यानंतर मुलाने तिला हॉटेलमध्ये बोलावले. तरुणी हॉटेलमध्ये आली असता तिच्यावर बलात्कार (tortured) केला.

हेही वाचा: ‘मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत एकच नेता; तो म्हणजे देवेंद्र फडणवीस’

आरोपी तरुणाने तरुणीला ३० मे रोजी दिल्लीतील (Delhi) द्वारका येथील पाच मजली हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. मुलगी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आरोपीने तिला एका खोलीत नेले. खोलीत आरोपीने पीडितेला थंड पेय दिले. त्यात नशा मिसळली होती. ते पेय पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला.

Web Title: Young Woman Tortured In Hotel They Meets Through A Dating App

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newsdelhi
go to top