

attempted murder HIV injection
ESakal
हैदराबादच्या पोचरम परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने तिच्या आजीच्या घरी आत्महत्या केली. एका तरुणाने तिला जबरदस्तीने इंजेक्शन दिल्याच्या घटनेनंतर सुमारे महिनाभराने ही घटना घडली. आरोपी जन्मापासून एचआयव्ही-पॉझिटिव्ह होता. ११ मार्च रोजी तो त्या तरुणीच्या घरी आला आणि तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने संतापून त्याने जबरदस्तीने स्वतःच्या रक्ताने भरलेली सिरिंज तिच्या शरीरात टोचली. यानंतर तिने धक्कादायक निर्णय घेतला आहे.