तुला जी आवडतेना तीच मला आवडते; आता बोल...

youth kills his lover boyfriend in chhattisgarh
youth kills his lover boyfriend in chhattisgarh

जशपूर (छत्तीसगड): तुला जी मुलगी आवडते ना तीच मुलगी मलाही आवडते. तिच्याशी तू काय बोलत होता, असे म्हणून एकाने दुसऱयाचा खून केल्याची घटना येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळवर गेल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. परंतु, तपासादरम्यान त्याचा खून झाल्याची माहिती पुढे आली. विशाल रजकच्या खून प्रकरणी आलोक कुजरला अटक करण्यात आली आहे.

आलोकने तपासादरम्यान सांगितले की, 'एका अल्पवयीन मुलीवर आमचे दोघांचेही एकतर्फी प्रेम होते. त्या मुलीसोबत विशाल बोलत असल्याचे पाहिले होते. त्याला भेटण्यासाठी बोलावले आणि चर्चेदरम्यान वाद झाला. यानंतर चाकूने मारहाण करून पळून गेलो होतो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com