esakal | आश्चर्यच : मर्सिडिजमधून विकतायत फळं, भाजीपाला!
sakal

बोलून बातमी शोधा

mercedece

करोनाच्या या काळात भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं अक्षरशः मोडलं. त्यात आधीच अडचणीत असलेल्या देशांची अर्थव्यवस्था तर रसातळाला गेली.

आश्चर्यच : मर्सिडिजमधून विकतायत फळं, भाजीपाला!

sakal_logo
By
सूरज यादव

हरारे (झिम्बाब्वे) : करोनाच्या या काळात भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं अक्षरशः मोडलं. त्यात आधीच अडचणीत असलेल्या देशांची अर्थव्यवस्था तर रसातळाला गेली.  विशेषतः आशिया आणि अफ्रिकेतील देशांना कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनचा खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यातला एक आर्थिक अडचणीत सापडलेला देश म्हणजे, झिम्बाब्वे. या देशात आधीपासूनस अर्थव्यवस्थेचे तीन-तेरा झाले होते. त्यातच कोरोनानं आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

खाण्या पिण्याचे हाल
कोरोनाचा झिम्बाब्वेच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसला असून, त्या देशातली गरिबांचे खाण्याचे हाल तर, झाले आहेतच. पण, तेथील श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरही उपासमारीची वेळ आली आहे. श्रीमंतांच्या घराच्या दारात आलीशान गाड्या आहेत. पण, घरात अन्नाचा कण नाही, अशी परिस्थिती आहे. यावर तोडगा म्हणूनच या श्रीमंतांनी आता या आलीशान गाड्या बाहेर काढल्या आहेत. या गाड्यांमधून किरणा साहित्य, फळं, भाजीपाला विकण्याचे काम अनेकजण करत आहेत.

हे वाचा - दुबईहून मृतदेह भारतात आणण्यासाठी सव्वा लाखांचा खर्च, तर जिवंत व्यक्तीसाठी...

झिम्बाब्वेतील हा रस्त्या रस्त्यांवर दिसणारा बदल सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. राजधानी हरारेच्या रस्त्यांवर हा प्रकार दिसू लागला असून, आलीशान गाड्यामधून तांदूळ, साखर, भाज्या, केळी विकली जात आहेत. गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने असे विक्रेते रस्त्या रस्त्यांवर दिसू लागले आहेत. यात अनेक जण नोकऱ्या गमावून बसलेले आहेत. त्यांच्याकडे रोजगाराची इतर कोणतिही साधनं नसल्यामुळं त्यांची उपासमार होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांनी छोट्या व्यवसायांचा पर्याय निवडला आहे. 

हे वाचा - आता ब्राझिलमध्येही 'जॉर्ज फ्लॉईड'; कृष्णवर्णीय महिलेच्या गळ्यावर पाय ठेवून उभा पोलिस

बेरोजगारीत वाढ
मुळातच झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. रोजगाराच अभाव, वीज, पाण्याचा तुटवडा बंद पडलेले कारखाने, अशा परिस्थितीत आलेल्या कोरोना संकटामुळं आहे त्या रोजगारातही 25 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता, झिम्बाब्वे नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस मुळं आलेल्या निर्बंधांमुळं हातांच्या बोटांवर मोजण्या इतकेच उद्योग शिल्लक राहिले आहेत. त्यातही फारशी समाधानकारक परिस्थिती नसल्यामुळं तरुणांची चिंता वाढली आहे.
 

loading image