विज्ञान शाखेत करिअर करायचय मग `हे` वाचाच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र यातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास विज्ञान शाखेत असंख्य अभ्यासक्रमांची दालने तुमच्यासाठी खुली आहेत. बी. एस्सी.बरोबरच बी. एस्सी. ब्लेंडेड आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रम हे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. विज्ञान शाखेतील पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच विशेष विषय घेऊन घेतलेले पदवी शिक्षण हे करिअरला नवी दिशा देणारे ठरू शकते.

बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र यातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास विज्ञान शाखेत असंख्य अभ्यासक्रमांची दालने तुमच्यासाठी खुली आहेत. बी. एस्सी. बरोबरच बी. एस्सी. ब्लेंडेड आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रम हे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. विज्ञान शाखेतील पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच विशेष विषय घेऊन घेतलेले पदवी शिक्षण हे करिअरला नवी दिशा देणारे ठरू शकते.

अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या वाटा निवडण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी कल चाचणी (अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) करून घेणे आवश्यक आहे. कारण, कल चाचणीच्या निष्कर्षा आधारे करिअरच्या वाटा निवडणे उपयुक्त ठरते. खरेतर अकरावीचे वर्ष हे बारावीच्या अभ्यासाच्या तयारीचे महत्त्वाचे वर्ष असते. याची जाणीव ठेवून अकरावीचा अभ्यास करताना आपण बारावीची ही तयारी करीत आहोत, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. तुम्ही अकरावीला विज्ञान शाखा निवडणार असाल, तर स्वयं अभ्यासाला विशेष महत्त्व द्यावे.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

अभ्यासक्रमातील विषय समजून घेणे तितके महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही दहावीचा अभ्यासक्रम मराठीतून पूर्ण केला असल्यास विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असल्यामुळे अकरावीचे पहिले सहा महिने विशेष परिश्रम घ्यावे लागतात. अशावेळी दररोज इंग्रजी-मराठी विज्ञानविषयक शब्दकोशाचा वापर करणे उपयुक्त ठरते. दहावीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण करून आलेले विद्यार्थी अकरावीच्या वर्गात इंग्रजीमध्ये उत्तरे देतात. अशा परिस्थितीत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा, आत्मविश्‍वास टिकवून ठेवावा. अकरावी आणि बारावीमध्ये विज्ञान शाखेचा अभ्यास करताना महाविद्यालयातील उपस्थिती शंभर टक्के असावी. सर्व तास आणि प्रात्यक्षिकांना उपस्थित राहावे. स्वयं अभ्यासासाठी पुरेसा वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

अकरावीत विज्ञान शाखा निवडल्यास विद्यार्थ्यांना बायफोकलचा पर्यायही स्वीकारता येईल. या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होऊ शकते. अकरावीच्या बायाफोकलचे प्रवेश या वर्षीपासून शून्य फेरीमध्ये होणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी बायफोकल विषय घेण्यास इच्छुक आहेत; त्यांनी संंधित महाविद्यालयात जाऊन सविस्तर माहिती घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही किंवा त्यांना अनेक दृष्टीने या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक वाटा उपलब्ध आहेत. बी. एस्सी., बीसीए (सायन्स), बी. एस्सी. ब्लेंडेड (बायोसायन्स) असे अनेक पर्याय उपलब्ध आहे.

पावसाळ्यात ज्येष्ठ, गर्भवती, मुलांची काळजी घ्या; फ्ल्यूबरोबरच कोरोनाची धास्ती

बी. एस्सी. हा अभ्यासक्रम जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) किंवा संगणकशास्त्र हे विषय घेऊन पूर्ण करता येतात. तसेच, बी. एस्सी. हा अभ्यासक्रम अ‍ॅनिमेशन, कृषिजैवतंत्रज्ञान, अ‍ॅग्रिकल्चर असे विषय घेऊनही पूर्ण करता येईल. बारावीनंतर बी. एस्सी. (ब्लेंडेड बायोसायन्स) हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामुळे एम. एस्सी. अभ्यासक्रमाला सहज प्रवेश मिळू शकतो. अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी ‘बी. आर्च’ अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये बॅचलर ऑफ व्होकेशनल (बी. व्होक) हा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. बारावी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पाच वर्षांच्या विविध इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात. पुणे आणि परिसरात हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र मिळवावे; जेणेकरून त्यांना खेळाडूंच्या कोट्यामधून प्रवेश मिळण्यास मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: information about Career in science