
नवीन वर्ष तरी चांगले जाईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
नवी दिल्ली- 2021 ला सुरुवात झाली आहे. मागील वर्ष अनेक अर्थाने पूर्ण जगासाठी आव्हानपूर्ण राहिले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोरोना विषाणूच्या संक्रमणाची राहिली. या महामारीने केवळ लोकांचा जीव घेतला नाही तर आर्थिक, रोजगारासह अनेक क्षेत्रात लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले.
नवीन वर्ष तरी चांगले जाईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. भारतात यावर्षी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी आपला रोजगार गमावला आहे, अशा लोकांनाही पुन्हा संधी मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात कोण-कोणत्या नव्या नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत आहेत, हे आपण पाहुया...
लष्कराने परत धाडला चीनचा सैनिक; वाट चुकून घुसला होता भारतीय हद्दीत
फूल स्टॅक डेवलपर्सं- हे डेवलपिंग आणि त्यासंबंधी मेंटेनेंसचं काम आहे.
लॉकडाऊनमुळे ऑनलाईन कामांचे महत्व वाढले आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कामांची मागणी वाढत आहे. जर तुमचा कोडिंगमध्ये रस असेल आणि जावा, सीएसएस, पाइथनची तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या क्षेत्रात आपलं नशीब अजमावू शकता.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)- भारतात या क्षेत्रात काम करणारे लोक कमी आहेत. एका रिपोर्टनुसार जवळजवळ 2500 जागा आर्टिफिशियल इंटेलिजेंस जागेसाठी शिल्लक आहेत. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. यासाठी एआई अलगॉरिदम, प्रोग्रॅमिंग इत्यादीची माहिती असणे आवश्यक आहे.
डाटा सायंटिस्ट- रिपोर्टनुसार अॅनेलेटिक्स रेवेन्यूमध्ये 16 टक्के मागणी अॅडवान्स्ड एनेलेटिक्स, डाटा साईंस, प्रीडिक्टिल मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये आहे. 2018 च्या तुलनेत हे 11 टक्क्यांनी जास्त आहे. याचा अर्थ भारतात डाटा सायंटिस्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी सांख्यिकी गणितासह SQL, पायथन आणि R सारख्या तांत्रिक गोष्टी आणि Power BI, Tableau लूल्सची माहिती असणे आवश्यक आहे.
प्रीतीने शेअर केली ऋतिक सोबतची एक खास आठवण
डिजिटल मार्केटिंग- जर तुम्ही क्रिएटिव असाल आणि ब्रँड-बिल्डिंगसह मार्केटिंगमध्ये रस ठेवत असाल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. ऑनलाईन कामासह व्यापारी कामासाठी डिजिटल मार्केंटिंगची मागणी वाढत आहे. त्यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करु शकता. एमबीए करणेही फायद्याचे ठरु शकते.
नव्या वर्षामध्ये भारतात आयटी सेक्टर गती पकडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डिजिटल क्षेत्रात सतत वाढत जाणाऱ्या कामकाजाने पुढील काळात तरुणांसाठी या क्षेत्रात अनेक नव्या संध्या उपलब्ध होणार आहेत.