बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनचा १० जानेवारीला नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. ऋतिकच्या फॅन्सनं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील ऋतिकला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याविषयीचा प्रीतीने ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

'पैशांसाठी कुठल्याही चित्रपटांत काम करावं लागलं'
प्रीतीनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओला एक कॅप्शन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, "ऋतिक तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की, आपण एवढे पुढे गेलो आहोत. मला आठवतयं जेव्हा माझा 19 वा वाढदिवस होता तेव्हाची एक आठवण आहे. तु आणि सुझान एका मोठा केक घेऊन माझी वाट पाहत बसला होतात. हे अजूनही माझ्या लक्षात आहे. ह्या कँप्शनमधून प्रितीने आपल्या 19 व्या वाढदिवसाची सुझान ऋतिक सोबतची आठवण शेअर केली आहे.
अजय देवगणने बेकायदेशीर ऍपवरुन मेसेज करत अमिताभ बच्चन यांना असं केलं होतं हैराण...
ऋतिक रोशननं आपला 47 वा वाढदिवस साजरा करताना त्याच्या " फायटर" या आगामी चित्रपटाचा 30 सेकंदाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये ऋतिक सोबत दीपिका पदुकोन देखील दिसणार आहे. प्रीती झिंटा बरोबरच विकी कौशल,टायगर श्रॉफ,रितेश देशमुख,सिद्दार्थ मल्होत्रा ,सोनाली बेंद्रे, अनिल कपुर,फराह खान अक्षय कुमार कटरिना कैफ ,शाहिद कपुर,फरहान अख्तर यांनी ऋतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आगामी रोमँटिक-कॉमेडी सिनेमात 'हे' दोन कलाकार साकारणार रणबीर कपूरच्या आई-वडिलांची भूमिका
ऋतिकनं वाढदिवस दिवशी शेअर केलेल्या "फायटर"ह्या चित्रपटाच्या टीझरची अनोखी भेट मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्या त्या पोस्टला लाईक्स केले आहे. या टीझरला ऋतिकच्या फॅन्स कडून चांगली पसंती मिळत आहे. काबिल, सुपर 30, जिंदगी ना मिलेगी दोबारा, जोधा अकबर , मोहोन्जो दारो, या ऋतिकच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तसेच तो त्याच्या नृत्यशैलीमुळे चर्चेत असतो.
Edited By - Prashant Patil