
इच्छुक उमेदवार ज्युनियर एग्जिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदासाठी २९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
AAI Recruitment 2021: नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) नवी दिल्लीमध्ये ज्युनियर एग्जिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी. विमानतळ प्राधिकरणाने या पदांच्या एकूण ३६८ रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार, इच्छुक उमेदवार ज्युनियर एग्जिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदासाठी २९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- पुढील ६ महिन्यात निघणार २० हजार जागांसाठी भरती; वाचा सविस्तर
कोण करू शकतं अर्ज?
विमानतळ प्राधिकरणातील कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (ज्युनियर एग्जिक्युटिव्ह) पदांसाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/बी.टेक. पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापक (मॅनेजर) पदासाठी बीई किंवा बी.टेक. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे आहे.
- इंजिनिअर्स तरुण-तरुणींनींना SBIमध्ये नोकरीची संधी; कोणतीही लेखी परीक्षा नाही
विमानतळ प्राधिकरण भरती : रिक्त पदांचा तपशील
- ज्युनियर एग्जिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) - २६४ पदे
- ज्युनियर एग्जिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) - ८३ पदे
- ज्युनियर एग्जिक्युटिव्ह (टेक्निकल) - ८ पदे
- मॅनेजर (फायर सर्व्हिस) - ११ पदे
- मॅनेजर (टेक्निकल) - २ पोस्ट
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)