Career After SSC: 10 वी नंतर पुढे काय? 'या' पर्यायांचा करा विचार...

विद्यार्थ्यांकडे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात.
jobs
jobssakal

विद्यार्थ्यांकडे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण सर्वात महतवाची गोष्ट म्हणजे दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं.

विद्यार्थी दहावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. तसेच आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात.

नेहमी विद्यार्थी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जीसारख्या विषयातून राज्याभरातून अवघी १२० मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते.

इथे आम्ही अशा 5 डिप्लोमा कोर्सेसबद्दल सांगत आहोत जे 10वी नंतरच करता येतात. म्हणजेच हा कोर्स करून तुम्ही लवकरच तुमच्या पायावर उभे राहू शकता.

jobs
SSC Exam Result 2023 : दहावीचा आज निकाल ; तुमचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी 'येथे' क्लिक करा

1. हॉटेल मॅनेजमेंट - आजकाल हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये खूप वाव आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटीमध्ये करिअर करायचे असेल, तर तुम्ही दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा करून या क्षेत्रात नोकरी मिळवणे सोपे होईल.

2. कॉम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग - संगणकाच्या युगात हा एक उत्तम पर्याय असू शकतो. या क्षेत्रात, तुम्हाला संगणक दुरुस्ती आणि नेटवर्किंगशी संबंधित माहिती मिळते जी चांगली नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

3. इंजीनियरिंग डिप्लोमा - अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये 10वी नंतर अभियांत्रिकी डिप्लोमा देतात. हे केल्यानंतर, तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित मध्यम स्तरावरील नोकऱ्या सहज मिळू शकतात.

4. ITI (इंडस्ट्रियल ट्रेनिंग)- 10वी नंतर ITI हा देखील चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मेकॅनिक, स्टेनो, कॉम्प्युटर असे अनेक विषय आहेत. यामध्ये फार मोठ्या नोकऱ्या नाहीत, पण तुम्हाला स्वतःचे काही काम करायचे असेल तर हा कोर्स करून तुम्ही सहज चांगले पैसे कमवू शकता.

5. स्टेनोग्राफी आणि टायपिंग - तुम्ही 10वी नंतर स्टेनोग्राफी आणि टायपिंगमध्ये डिप्लोमा देखील करू शकता. काही राज्यांमध्ये, स्टेनोग्राफी हा विषय 11वी आणि 12वी मध्ये देखील निवडला जाऊ शकतो. न्यायालय आणि इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये अशा रिक्त जागा येत राहतात, ज्यासाठी स्टेनो अनिवार्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com