esakal | शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान 9 सप्टेंबरला करतील एनआयआरएफ रॅंकिंग जाहीर! गेल्या वर्षी 'ही' महाविद्यालये होती टॉपवर
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणमंत्री प्रधान 9 सप्टेंबरला करतील एनआयआरएफ रॅंकिंग जाहीर!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान 9 सप्टेंबर रोजी 2021 वर्षासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) क्रमवारी जाहीर करतील.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान 9 सप्टेंबरला करतील NIRF रॅंकिंग जाहीर!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) 9 सप्टेंबर रोजी 2021 वर्षासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework) (NIRF) क्रमवारी जाहीर करतील. शिक्षणमंत्री गुरुवारी दुपारी 12 वाजता व्हर्च्युअल मोडमध्ये देशभरातील शैक्षणिक संस्थांची एनआयआरएफ रॅंकिंग 2021 अधिकृतपणे लॉंच करतील. त्यानंतर देशातील टॉप महाविद्यालये / शैक्षणिक संस्थांची यादी nirfindia.org या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. कोरोना (Covid-19) साथीमुळे देशभरातील शैक्षणिक संस्था बंद झाल्यामुळे या वर्षी एनआयआरएफ क्रमवारी जाहीर करण्यास विलंब झाला आहे. 2020 साठी NIRF रॅंकिंग 11 जून रोजी जाहीर करण्यात आली होती.

हेही वाचा: प्रशासकीय पदांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये भरती!

या निकषांवर आधारित आहे एनआयआरएफ रॅंकिंग

एनआयआरएफ रॅंकिंग अध्यापन, शिक्षण आणि संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक पद्धती, पदवीचे परिणाम, आउटरीच, सर्वसमावेशकता या निकषांवर जाहीर केली जाते.

गेल्या वर्षी होती ही महाविद्यालये टॉपवर

गेल्या वर्षी देखील एनईआरएफ रॅंकिंग कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन मोडमध्ये सुरू करण्यात आली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मद्रासला भारताची सर्वोच्च संस्था 2020 (एकूण श्रेणी) घोषित करण्यात आले, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळूर हे टॉप विद्यापीठ होते आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ.

हेही वाचा: PFRDA भरती 2021 : सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

एनआयआरएफ रॅंकिंग 2020 च्या विविध श्रेणींनुसार टॉप शैक्षणिक संस्था...

  • एकूण श्रेणी - आयआयटी मद्रास

  • विद्यापीठ - आयआयसी बंगळूर

  • अभियांत्रिकी - आयआयटी मद्रास

  • व्यवस्थापन - आयआयएम अहमदाबाद

  • फार्मसी - जामिया हमदर्द

  • कॉलेज - मिरांडा हाउस

  • औषध - अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था - एम्स, नवी दिल्ली

  • कायदा - एनएलएसआययू बंगळूर

  • वास्तुकला - आयआयटी, खरगपूर

  • दंतचिकित्सा - मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस (एमएएमसी), नवी दिल्ली

loading image
go to top