इग्नूतर्फे एससी-एसटी विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील (इग्नू) या सत्राच्या प्रवेशासाठी अनुसूचित जाती (एससी) आणि जनजाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्याचे प्रवेशशुल्क माफ करण्यात आले
education news Admission fee waiver for SC ST students by IGNOU pune
education news Admission fee waiver for SC ST students by IGNOU pune sakal

पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील (इग्नू) या सत्राच्या प्रवेशासाठी अनुसूचित जाती (एससी) आणि जनजाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्याचे प्रवेशशुल्क माफ करण्यात आले आहे. विभागीय संचालक डॉ. डी.आर. शर्मा यांनी यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ५५ अभ्यासक्रमांसाठी शुल्कमाफी करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल, अशा विद्यार्थ्यांना केवळ ३०० रुपयांचे नोंदणी शुल्क भरून प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://ignouadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर लॉगईन करावे. प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com