esakal | इथे करा इंटर्नशिप अन् मिळवा ३५ हजारांपर्यंत स्टायफंड
sakal

बोलून बातमी शोधा

इथे करा इंटर्नशिप अन् मिळवा ३५ हजारांपर्यंत स्टायफंड

इथे करा इंटर्नशिप अन् मिळवा ३५ हजारांपर्यंत स्टायफंड

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : सध्या विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध असल्या तरी सरकारी नोकरीचे आकर्षण मात्र कमी झालेले दिसत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणे पहिल्यासारखे सोपे राहिलेले नाही. इथे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळते. तसेही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. यामुळे अभ्यासाचा चांगलाच ताण असतो. (Get-an-internship-here-and-get-a-stipend-of-up-to-Rs-35,000-nad86)

शासकीय नोकरीमध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीचे मोठे आव्हान असते. मुलाखतीच्या वेळी कौशल्य व बुद्धिमत्ता चांगलीचं पणाला लागते. लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला विविध पुस्तकांची मदत घेता येते. परंतु, मुलाखतीत प्रॅक्टिकल ज्ञानच तुम्हाला यशस्वी करू शकते. इथेच खरा गोंधळ उडतो आणि संधी हुकण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

मुलाखतीला गेल्यानंतर अनेकांचे हातपाय कापाला लागतात. मुलाखतीचे वेगळेच टेंशन असते. अनपेक्षित दबाव ओढून घेतला जातो. तेव्हा तुम्ही खाजगी क्षेत्रात इंटर्नशिप करू शकता. असे केल्याने प्रॅक्टिकल ज्ञान मिळवता येते. तसेच सरकारच्या विविध विभागांमध्ये इंटर्नशिपच्या संधी आहेत. इंटर्नशिप काळात तुम्ही आठ ते ३५ हजारांपर्यंत स्टायफंडही मिळवू शकता.

माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय

माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयातर्फे ई-गव्हर्नन्स, आयटी, सायबर सक्योरिटी, हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटर्नशिपची करण्याची संधी दिली जाते. ही संधी बीई, बीटेक, एमई, एमटेक करणाऱ्या विद्यार्थांना वर्षातून दोनदा मिळत असते.

लोकसभेत इंटर्नशिप

द्विपदवीधर विद्यार्थ्यांना लोकसभेत इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये स्टायफंड देखील दिला जातो. विज्ञान, सामाजिक विज्ञान, लॉ, फायनान्स मॅनेजमेंट आदी विषयांमधील पदवी, द्विपदवीधर विद्यार्थीही इंटर्नशिप करू शकतात.

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयातर्फे दरवर्षी ऑन साइट आणि ऑफ साइट इंटर्नशिपची करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात पदवीधर ऑन साईट इंटर्नशिप करू शकतात तर पदवी न मिळवलेले विद्यार्थी ऑफ साईट इंटर्नशिप करू शकतात.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, इकोनॉमिक्स, फायनान्स, लॉ, कॉम्प्युटर, लायब्ररी मॅनेजमेंट या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते. तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येथे संधी उपलब्ध आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे ‘डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेअर्स’मध्ये इंटर्नशीपची करण्याची संधी दिली जाते. अर्थशास्त्र, फायनान्स आणि मॅनेजमेंट या विषयांमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना ही संधी मिळते. तसेच या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुणांना सहा महिन्यांची इंटर्नशिपही करता येते. सोबतच दहा हजार रुपये स्टायपेंडही दिला जातो. दरवर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात अर्ज करण्याची संधी असते.

(Get-an-internship-here-and-get-a-stipend-of-up-to-Rs-35,000-nad86)

loading image