esakal | HAL Recruitment 2021: इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी; अप्रेंटिसच्या 165 पदांसाठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_HAL

अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना पूर्णपणे वाचून घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

HAL Recruitment 2021: इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी; अप्रेंटिसच्या 165 पदांसाठी भरती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

HAL Apprentice Recruitment 2021: पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी ही महत्त्वाची बातमी. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदाची भरती करण्यात येणार आहे. एकूण 165 पदे भरली जाणार असून त्यापैकी 87 पदे ही इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी राखून ठेवण्यात आली आहेत. 

टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांवरही भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. यासंबंधीची लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे. अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल, त्यामुळे अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना पूर्णपणे वाचून घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

Air force recruitment 2021: हवाई दलात २५५ जागांची भरती; लगेच करा अर्ज​

पदांचा तपशील -
इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस एकूण - 87
एअरोनॉटिकल इंजिनीअर - 5
कॉम्प्युटर इंजिनीअर - 5
सिव्हिल इंजिनीअर - 2
इलेक्ट्रीकल इंजिनीअर - 18
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर - 20
मेकॅनिकल इंजिनीअर - 30
प्रोडक्शन इंजिनीअर - 04

हे वाचा - फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा; UPSCमध्ये २९६ पदांची भरती​

टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस एकूण - 78
एअरोनॉटिकल इंजिनिअर - 2
सिव्हिल इंजिनीअर - 2
कॉम्प्युटर इंजिनीअर - 5
इलेक्ट्रीकल इंजिनीअर - 20
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर - 15
मेकॅनिकल इंजिनीअर - 30

महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा होणार नाही

शैक्षणिक पात्रता -
इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. 

टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशाची तारीख आणि उत्तीर्ण होण्याच्या तारखेमधील फरक 3 वर्षापेक्षा जास्त नसावा.

- अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image