esakal | Govt Jobs: IDBI बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; ७ जानेवारीपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_IDBI_Bank

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

Govt Jobs: IDBI बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; ७ जानेवारीपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

IDBI Bank SO Recruitment 2020: पुणे : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (IDBI) स्पेशालिस्ट ऑफिसरच्या १३४ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांवर काम करू इच्छिणारे उमेदवार आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २४ डिसेंबरपासून सुरू झाली असून ७ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

SBI PO 2020: स्टेट बँक पीओ परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर; असं करा डाउनलोड​

पात्रता - 
IDBI मधील ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या पदांची पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आहे. यासाठी उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली अधिसूचना पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

पदांची एकूण संख्या - १३४

पद - संख्या 
व्यवस्थापक - ६२ जागा (ग्रेड बी)
एजीएम - ५२ जागा (ग्रेड सी)
डीजीएम - ११ जागा (ग्रेड डी)
सहाय्यक व्यवस्थापक - ९ जागा (ग्रेड अ)

VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी कोणताही उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. फी जमा केल्यावरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असे मानले जाईल. तसेच देशभरात कुठेही पोस्टिंग होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

आवश्यक तारखा -
ऑनलाईन नोंदणीला सुरवात - २४ डिसेंबर २०२०
ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख - ७ जानेवारी २०२१ 
ऑनलाईन फी भरण्यासाठीची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०२१

Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

असा करा अर्ज -

या पदांसाठी उमेदवार केवळ अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

फी -
- एससी, एसटी - ५०० रुपये
- इतर - ७०० रुपये

- अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- IDBIच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image