esakal | SBI PO 2020: स्टेट बँक पीओ परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर; असं करा डाउनलोड
sakal

बोलून बातमी शोधा

SBI PO Preliminary Exam 2020 Admit Card Released

एसबीआय पीओ पदांवर करण्यात येणाऱ्या भरतीची प्राथमिक परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.

SBI PO 2020: स्टेट बँक पीओ परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर; असं करा डाउनलोड

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

SBI PO Admit Card 2020: नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी एसबीआय रिक्रूटमेंट सेलने प्रवेश पत्र (Admit Card) प्रसिद्ध केली आहेत. 

भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एसबीआय करिअरच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ते डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. पुढील आठवड्यात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

एसबीआय पीओ पदांवर करण्यात येणाऱ्या भरतीची प्राथमिक परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. 31 डिसेंबर 2020 आणि 2 आणि 4 जानेवारी 2021 रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. एसबीआय 2000 हून अधिक रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेत आहे. 

प्राथमिक परीक्षेचं प्रवेश पत्र डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच पुढील वर्षी जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील परीक्षेसाठी निवड केली जाईल.

Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

असं डाउनलोड करा अॅडमिट कार्ड
- सर्वात आधी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइट वर जावे आणि करिअर टॅबवर क्लिक करावे. 
- त्यानंतर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाइन प्रारंभिक परीक्षा प्रवेश पत्र अधिसूचनावर क्लिक करावे. 
- येथे आपणास लॉगिन पेज दिसेल. 
- उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक, रोल नंबर, पासवर्ड आणि जन्म तारीख रकाने भरावे लागतील. 
- त्यानंतर प्रवेश पत्र तुम्हाला दिसेल. आता ते तुम्ही डाउनलोड करू शकता.

SBIच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image