12 वी नंतर सैन्यात जाण्याचे तीन मार्ग, जाणून घ्या प्रक्रिया

सैन्यात भरती होण्याचे तीन मुख्य मार्ग कोणते आहेत आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? ते सविस्तर जाणून घेऊयात.
Indian Army Bharti
Indian Army Bhartiesakal
Summary

सैन्यात भरती होण्याचे तीन मुख्य मार्ग कोणते आहेत आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? ते सविस्तर जाणून घेऊयात.

बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात (सैन्यात) (Indian Army) भरती होऊन देशसेवा करण्यासाठी आणि सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवण्याची मोठी संधी तरुणांना आहे. बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षण (12th Education) घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यात दाखल होण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यासाठी अनेक प्रकारच्या भारतीय स्तरावरील परीक्षा असतात. त्यांच्यासाठी वेगवेगळी पात्रता आहे. सैन्यात भरती होण्यासाठी शारीरिक चाचणीही (Physical Test) पास व्हावी लागते. सैन्यात भरती होण्याचे तीन मुख्य मार्ग कोणते आहेत आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? ते सविस्तर जाणून घेऊयात.

Indian Army Bharti
भारतीय सैन्यात 'या' पदांसाठी भरती; लेखी परीक्षेशिवाय होणार निवड

भारतीय सैन्यात भरती होण्याचे तीन मुख्य मार्ग येथे आहेत.

- एनडीए परीक्षा

– टेक्निकल एंट्री स्कीम

- इंडियन आर्मी रिक्रूटमेंट रॅली

एनडीए परीक्षा (NDA Exam) -

बारावीनंतर भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न असेल तर एनडीए हा एक उत्तम पर्याय आहे. एनडीएची परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेतली जाते. एनडीए उत्तीर्ण झाल्यानंतर नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅडेटला लष्करातील अधिकारी पदावर पर्मनंट कमिशन मिळते. एनडीएच्या परीक्षेसाठी उमेदवाराचे वय 16.5 ते 19.5 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर कला, विज्ञान, वाणिज्य कोणत्याही शाखेसह बारावी उत्तीर्ण असावेत. एनडीए परीक्षेची लेखी परीक्षा, एसएसबी मुलाखत आणि शारीरिक चाचणी हे तीन टप्पे असतात.

Indian Army Bharti
भारतीय सैन्यात 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी; 63 हजारांपर्यंत मिळणार पगार

तांत्रिक प्रवेश योजना (Technical Entry Scheme)-

टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या माध्यमातूनही तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊ शकता. टेक्निकल एन्ट्री स्कीम ही बारावी पास असलेल्या किंवा करत असलेल्या तरुणांसाठीही आहे. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तुम्ही एसएसबीची मुलाखत थेट देऊ शकता. निवड झाल्यानंतर पाच वर्षांचे प्रशिक्षण असते. आर्मीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये याचे चार वर्षांचे प्रशिक्षण आहे. ऑफिसर्स अॅकॅडमीमध्ये एक वर्षाचे ऑफिसर्स ट्रेनिंग होते. टेक्निकल एन्ट्री स्कीमसाठी विद्यार्थ्याने दहावी आणि बारावी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बारावीला किमान 70 टक्के गुण असावेत. जेईई परीक्षा उत्तीर्ण होणंही आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 16.5 वर्षे आणि कमाल वय 19.5 वर्षे असावे.

भारतीय सेना भरती रॅली (Indian Army Recruitment Rally) -

भारतीय लष्कराकडून दहावी आणि बारावी उत्तीर्ण युवकांसाठी नियमितपणे भरती रॅलीचे आयोजन केले जाते. झोननिहाय भरती मेळाव्याचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये संबंधित झोनमधील तरुणांचाच सहभाग असतो. रिक्रुटमेंट रॅलीच्या माध्यमातून सैनिक होण्यासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं. भरती मेळाव्याची अधिसूचना लष्कराच्या https://joinindianarmy.nic.in/ वेबसाइटवर अपडेट होत राहते. इथे चेक करून माहिती मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com