Indian Army Recruitment 2020: भारतीय सैन्यात बंपर भर्ती; १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

टीम ई-सकाळ
Sunday, 27 December 2020

भारतीय सैन्याने गुजरातमध्येही आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही भरती आयोजित केली आहे.

Indian Army Recruitment Rally 2020: नवी दिल्ली : भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय सेनेने नुकतीच दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना देशाच्या सेवेत योगदान देण्यासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

गया येथील भारतीय सैन्याच्या ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये एमटीएस, कुक, ड्रायव्हर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. २ फेब्रुवारी २०२१ ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, एमटीएस, कुक, ड्रायव्हर या पदांसाठी एकूण ८५ जागांची भरती करण्यात येणार आहे. भारतीय सैन्य भरती रॅली 2020 अंतर्गत भारतीय सैन्य विविध राज्यात भरती घेण्यात येत आहे. बिहारच्या गयामधील भरतीसाठी दहावी आणि बारावी पात्र उमेदवारांसाठी भरती आयोजित करण्यात येत आहे. उमेदवारांनी सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

Govt Jobs: IDBI बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती; ७ जानेवारीपर्यंत करा अर्ज​

Indian Army Recruitment Rally 2020: भारतीय सैन्याने गुजरातमध्येही आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही भरती आयोजित केली आहे. स्टोअर कीपर, नर्सिंग असिस्टंट, सोल्जर (जनरल ड्यूटी), सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/दारूगोळा), सोल्जर ट्रेड्समॅन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी २०२१ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी. 

भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army jobs 2020 class 10 and 12 passouts can apply for posts of cook and driver

Tags
टॉपिकस
Topic Tags: