esakal | सी-डॅकतर्फे ऑनलाइन PG, Diploma अभ्यासक्रम; २९ जुलै अंतिम मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

सी-डॅकतर्फे ऑनलाइन PG, Diploma अभ्यासक्रम; २९ जुलै अंतिम मुदत

सी-डॅकतर्फे ऑनलाइन PG, Diploma अभ्यासक्रम; २९ जुलै अंतिम मुदत

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : देशातील संगणन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या प्रगत संगणन विकास केंद्राच्या (Center for Advanced Computing Development - C-DAC) वतीने ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांची(Post Graduate, Diploma Course) घोषणा करण्यात आली आहे. संगणन, कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटीक्स, माहिती व्यवस्थापन, सॉफ्टवेअर विकसन आदी क्षेत्रातील अद्ययावत विषयांचा यात समावेश आहे. उद्योगांची भविष्यकालीन गरज ओळखून हे अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.

सी-डॅकच्या देशभरातील केंद्रांवर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. ३० आठवड्यांच्या या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत २९ जुलै पर्यंत आहे. सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला आवश्यकता वाटल्यास प्रत्यक्षही शिक्षकांना भेटून समाधान करता येईल. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांमुळे नोकरी मिळण्यास साहाय्य होत आहे, असे सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सकाळीशी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा: 'नवोदय' प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा

पात्रता

अभियांत्रिकी पदवीधर, विज्ञान शाखेचा पदवीधर आणि मास्टर इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन

अभ्यासक्रमांचा तपशील

१) पोस्ट ग्रॅज्युएशन (पीजी) डिप्लोमा इन ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग

२) पीजी डिप्लोमा इन सिस्टम डिझाइन

३) पीजी डिप्लोमा इन बिग डाटा अनालिटिक्स

४) पीजी डिप्लोमा इन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम ॲण्ड सिक्युरिटी

५) पीजी डिप्लोमा इन व्हीएलएसआय

६) पीजी डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्ज

७) पीजी डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स

८) पीजी डिप्लोमा इन मोबाईल कॉम्प्युटिंग

९) पीजी डिप्लोमा इन ॲडव्हान्स सिक्युअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

१०) पीजी डिप्लोमा इन जिओ-इन्फोरमेटिक्स

११) पीजी डिप्लोमा इन रोबोटिक्स ॲण्ड अलाइड टेक्नॉलॉजी

हेही वाचा: ITI मध्ये स्थानिकांना 90 टक्के प्रवेश

ठळक वैशिष्ट्ये

  • अभ्यासक्रमात अंतर्गत मूल्यमापन

  • आयसीटी उद्योगांच्या दृष्टीने आवश्यक विषयांचा समावेश

  • सी-डॅक सह उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  • मुलाखत, योग्यता आदी कौशल्याबद्दल

प्रशिक्षण

- ट्यूटोरीयल, प्रोजेक्ट्स आदींचा समावेश

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत ः २९ जुलै

  • सी-डॅक सामाईक पात्रता परिक्षा ः १) सी-कॅट १ -ः ७ ऑगस्ट, २) सी-कॅट २ ः ८ ऑगस्ट

  • अभ्यासक्रमाला सुरवात ः २१ सप्टेंबर

अधिक माहिती आणि प्रवेश संकेतस्थळ ः

www.cdac.in किंवा acts.cdac.in

हेही वाचा: कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती; महिन्याला 69 हजार पगार

''ऑनलाइन शिक्षण हा न्यू नॉर्म झाला आहे. विद्यार्थ्यांना बाजारातील आवश्यकतेनुसार अद्ययावत प्रशिक्षण देणारे या अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के प्लेसमेंटची क्षमता आहे. नोकरीसाठी बाहेर पडल्यावर या अभ्यासक्रमाचा निश्चित फायदा होईल.''

- डॉ. हेमंत दरबारी, महासंचालक, सी-डॅक

loading image