‘शिक्षणशास्त्रा’च्या प्रवेश नोंदणीची 'या' तारखेपर्यंत मुदत | Educational News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission process

‘शिक्षणशास्त्रा’च्या प्रवेश नोंदणीची 'या' तारखेपर्यंत मुदत

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सध्या विविध शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत बीए- बीएड., बी. एस्सी. बी.एड. या संयुक्‍त पदवी शिक्षणक्रमासोबत बी. एड.- एम.एड. या संयुक्‍त शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशाचे वेळापत्रक जारी झाले आहे. याअंतर्गत सीईटी दिलेल्‍या पात्र विद्यार्थ्यांना संकेतस्‍थळावर नोंदणीसाठी शुक्रवार (ता. २९) पर्यंत मुदत असणार आहे. जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश वेळापत्रकाची घोषणा केली जात आहे. याअंतर्गत शिक्षणशास्‍त्र विद्याशाखेतील दोन संयुक्‍त पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रकदेखील जाहीर झाले आहे. यामध्ये बी. ए. बी. एड. किंवा बी. एस्सी. बी. एड. हा अभ्यासक्रम, तसेच बी. एड. एम.एड. या संयुक्‍त पदवी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. सध्या जाहीर केलेले वेळापत्रक हे तात्‍पुरते असून, यात परिस्‍थिती व सूचनांनुसार आवश्‍यक बदल केले जाऊ शकतात, असे सीईटी सेलतर्फे स्‍पष्ट करण्यात आले आहे. तसेच, अन्‍य महत्त्वाच्‍या सूचनादेखील संकेतस्‍थळावर जारी करण्यात आल्‍या आहेत. प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी या सर्व सूचनांचे काटेकोर वाचन करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. २८ जानेवारी २०२२ ही प्रवेश प्रक्रियेची कट-ऑफ दिनांक निश्‍चित केलेली आहे. त्‍यानुसार या तारखेपूर्वी संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

हेही वाचा: सरकारी बॅंकॉंमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! उद्या शेवटची संधी

असे आहे संभाव्‍य वेळापत्रक -

ऑनलाइन नोंदणी-ऑप्‍शनफॉर्म भरणे--------२९ नोव्‍हेंबरपर्यंत

ई-स्‍क्रूटीनीतून कागदपत्र पडताळणी-----------२ डिसेंबरपर्यंत

अल्‍फाबेटिकल मेरीट लिस्‍ट प्रसिद्धी---------६ डिसेंबर

यादीबाबत हरकती नोंदविण्याची मुदत-------७ व ८ डिसेंबर

पहिल्‍या फेरीसाठी अंतीम गुणवत्ता यादी------१० डिसेंबर

पहिली निवड यादी-------------------------------१४ डिसेंबर

विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चिती मुदत-----------१५ ते १८ डिसेंबर

हेही वाचा: Register now : बीटेकमध्ये करिअरच्या संधी; २६ नोव्हेंबरला वेबिनार

loading image
go to top