LIC
LICesakal

LIC फायनान्समध्ये 'या' पदांसाठी भरती; दिल्ली, मुंबईसह 'या' शहरांत रिक्त पदे

LIC HFL Recruitment 2021 : एलआयसी हाउसिंग (LIC Housing) फायनान्समध्ये सरकारी नोकरीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही कामाची बातमी! एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited) कंपनीने असोसिएट फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने 24 मे 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), कोलकाता, बेंगळुरू आणि भोपाळ शहरांमध्ये एकूण 6 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. दरम्यान, हि सर्व रिक्त पदांची भरती एलआयसी-एचएफएलकडून (LIC-HFL) कराराच्या आधारावर केली जाणार आहेत. त्यामुळे कराराचा कालावधी सुरूवातीला सहा महिन्यांचा असेल, जो पुढील सहा महिन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. (lic hfl recruitment 2021 for associates for csr activities apply online at lichousing com by june 7)

Summary

एलआयसी हाउसिंग (LIC Housing) फायनान्समध्ये सरकारी नोकरीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही कामाची बातमी!

अर्ज कसा करावा?

दरम्यान, इच्छुक उमेदवार एलआयसी-एचएफएलच्या अधिकृत संकेतस्थळावर (lichousing.com) आपला अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरु शकतात. 24 मे पासून या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 7 जून 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

कोण अर्ज करू शकेल?

ज्या उमेदवारांनी किमान 55% गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंट या विषयांत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केली आहे, ते उमेदवार एलआयसी-एचएफएल असोसिएट भरतीमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, दूर शिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन), पार्ट-टाईमची पदवी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. या व्यतिरिक्त, 1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय 23 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन चाचणी व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल आणि गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. दरम्यान, ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत या दोन्हीच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाणार आहे.

LIC
CA परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल; 'या' परीक्षांना 5 जुलैपासून प्रारंभ

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर वार्षिक 6 ते 9 लाख रुपये पगार (सीटीसी) देण्यात येईल.

lic hfl recruitment 2021 for associates for csr activities apply online at lichousing com by june 7

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com