esakal | डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:मध्ये घडवा सकारात्मक बदल
sakal

बोलून बातमी शोधा

डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:मध्ये घडवा सकारात्मक बदल

डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:मध्ये घडवा सकारात्मक बदल

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : सध्याच्या काळात लोकांना वेगवेगळी डिझाईन्स (Designs) हवी असतात. मग डिझायनर्स कल्पकतेचा वापर करून वैविध्यपूर्ण डिझाइन्स तयार करण्यात कंपन्यांना मदत करू शकतात. म्हणूनच डिझायनर्सना प्रचंड वाव मिळू लागला आहे. डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमाला (Diploma or degree course) प्रवेश घेतल्यानंतर डिझायनिंगचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्यानंतर विद्यार्थी प्रोडक्ट डिझाइन, इंटरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन आदी शाखांमधून आपल्या आवडत्या शाखेची निवड करून त्यात उत्तम करिअर करू शकतात. (Make-a-positive-change-in-yourself-by-completing-a-design-course)

डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंटकडे वळू शकतात. विविध प्रदर्शने, सत्कार समारंभ तसेच अन्य कार्यक्रमांसाठी सेट डिझाइन करावा लागतो. चित्रपटांसाठी भव्य-दिव्य सेट्सची उभारणी करणे हे कला दिग्दर्शकाचे काम असते. डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कला दग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही प्रोडक्ट डझाईन करू शकता. उदाहरणार्थ दहा वर्षांपूर्वीच्या खुर्चीचे डिझाईन आज पहायला मिळत नाही. त्यात बदल होत असतात. हे बदल करण्यात प्रोडक्ट डिझायनर्सचा महत्त्वाचा वाटा असतो. शाळेसाठी लागणारे फर्निचर, घरासाठी फर्निचर, डायनिंगसाठीचे फर्निचरही डिझाईन केले जाते. त्यामुळे या क्षेत्रातही संधी आहेत.

डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी नव्या गोष्टी शिकून आणि स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून पुढे जाऊ शकतात. दहावी झाल्यानंतर डिझायनिंगची आवड असणारे विद्यार्थी डिप्लोमा करू शकतात. दोन वर्षांचा डिप्लोमा केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. त्यासाठी तीन किंवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

डिझायनिंगचे अनेकविध अभ्यासक्रम

  • कर्मशियल डिझायनिंग

  • बॉटल डिझायनिंग

  • फोटोग्राफी

  • टेक्सटाईल डिझायनिंग

  • मेटल डिझायनिंग

  • स्कल्प्चर

  • पेंटिंग

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

स्किल्सही विकसित केली जातात

डिझायनिंगच्या अभ्यासक्रमात बऱ्याच गोष्टी अंतभरूत केलेल्या असतात. विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन कसे करायचे हे शिकवले जाते. कोणताही प्रकल्प किंवा काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार केले जाते. इंटरिअर डिझाईन कोर्समध्ये विकसित केलेली महत्त्वाची कौशल्ये जसे की स्थानिक जागरूकता, तांत्रिक ज्ञान, अर्थसंकल्प, टाईम मॅनेजमेंट, डायनॅमिक क्रिएटिव्हिटी यासोबतच काही सॉफ्ट स्किल्सही विकसित केली जातात.

(Make-a-positive-change-in-yourself-by-completing-a-design-course)

loading image