Microsoft WFH Recruitment: Microsoft मध्ये इंजिनिअर्सना गलेलठ्ठ पगार अन् कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम!

तूम्हाला घरातून काम करायची सवय झाली असेल तर ही संधी सोडू नका
Microsoft WFH Recruitment: Microsoft मध्ये इंजिनिअर्सना गलेलठ्ठ पगार अन् कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम!

आयटी क्षेत्रातील टॉपची कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी आली आहे. कंपनीने मायक्रोसॉफ्टनं सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुवेधेसाठी गलेलठ्ठ पगार आणि कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची संधी देण्यात येणार आहे. त्यामूळे घरातून काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संधी दवडू नये.

कोरोना काळात सर्वच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे दार कर्मचाऱ्यांसाठी उघडले होते. त्यामूळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही संधी होती. कोरोनात जिथे सर्व काही ठप्प होते. तिथे घरातून काम करून आयटी क्षेत्रातील लोक घर चालवत होते. पण, कोरोनाचे सावट दुर झाले आणि वर्क फ्रॉम होम मागे पडले. पण, तूम्हाला घरातून काम करायची सवय झाली असेल आणि तूम्ही या नोकरीच्या पात्रतेचे असाल तर ही संधी सोडू नका.

Microsoft WFH Recruitment: Microsoft मध्ये इंजिनिअर्सना गलेलठ्ठ पगार अन् कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम!
Railway Recruitment : दहावी उत्तीर्णांना मध्य रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

कोणासाठी आहे संधी

'कंटेंट डॉट टेकगिग'ने त्याबाबत अधिकृत माहीती दिली आहे,  कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत.

उमेदवाराकडून अपेक्षा

उमेदवाराकडे क्लाउड बेस्ड उत्पादने तयार करण्याचा व शिपिंगचा 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल. क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे याचाही 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव अपेक्षित आहे.

Microsoft WFH Recruitment: Microsoft मध्ये इंजिनिअर्सना गलेलठ्ठ पगार अन् कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम!
NMC Recruitment : महापालिका नोकर भरतीची प्रक्रिया सुरू राहणार!

ऑन साइट कस्टमर्सशी डील करता यावे, टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर्स पदवी किंवा इंजिनीअरिंगची पदवी उमेदवाराकडे असावी. अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा असावे. तर, AWS/GCP प्रोगामिंगचा अनुभव असावा लागेल.

उमेदवाराला क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणे, त्यातल्या गॅप्स शोधणे, त्यांच्या मर्यादा ओळखणे, त्यातले अडथळे दूर करणे असे कामाचे स्वरूप असेल.

Microsoft WFH Recruitment: Microsoft मध्ये इंजिनिअर्सना गलेलठ्ठ पगार अन् कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम!
BSF Recruitment 2023 : परिक्षेशिवाय भरती होण्याची सुवर्णं संधी, एक लाखापेक्षा जास्त मिळेल पगार

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी अपेक्षा

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी अर्ज करणार असाल. तर, या पदासाठी उमेदवाराकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असायला हवाल. क्लाउड बेस्ड सोल्युशन्समध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com