
केंद्रीय गृह मंत्रालयात नोकरीची संधी; महिन्याला लाखाच्या वर पगार
केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध विभागातील विविध पदासाठी भरती जाहीर केली असून इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
यात विशेष म्हणजे सहाय्यक संपर्क अधिकारी, सहाय्यक लेखापाल आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नियुक्त्या या प्रतिनियुक्तीच्या तत्वावर असतील. ज्याचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही.
हेही वाचा: MPSC : नाशिकच्या उमेदवारांचा डंका
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहीरत पाहून विहित नमुन्यांमध्ये आणि निश्चित वेळेत आपले अर्ज मागवले आहेत. गृहमंत्रालयाने नव्या भरती संदर्भात काढलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार परिपत्रक जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.
हेही वाचा: UPSC 2021 : दुसऱ्या प्रयत्नात दुसरा क्रमांक; अंकिता अग्रवाल शाळांसाठी करणार काम
पदे आणि एकूण जागा
सहाय्यक संपर्क अधिकारी - 4 जागा
सहाय्यक - 5 जागा
लेखापाल -1 जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक - 1 जागा
हेही वाचा: UPSC परीक्षेच्या अंतिम निकालाचे गुण जाहीर; टॉपर श्रुतीला मिळाले 'इतके' Marks
वयोमर्यादा व पगार
उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा अधिक नसावे. या पदांसाठी मासिक वेतन 35,400 ते 1,12,400 रुपयांच्या जवळपास असेल
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता
उपसंचालक (प्रशासन), DCPW (MHA), ब्लॉक क्रमांक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003
Web Title: Ministry Of Home Affairs Has Released Press For Recruitment Check Here How To Apply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..