मुलाखती दरम्यान सहसा कोणते प्रश्न विचारले जातात? जाणून घ्या | Common Job Interview Questions | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Most Common Job Interview Questions and Answers

मुलाखती दरम्यान सहसा कोणते प्रश्न विचारले जातात? जाणून घ्या

नोकरीसाठी मुलाखत देताना आपण खूप पूर्वतयारी करतो पण मुलाखतकार आपल्यासा आमच्या अपेक्षेपलीकडे प्रश्न विचारतात, ज्याची उत्तरे देताना आपला गोंधळ उडतो. त्यामुळे मुलाखतीदरम्यान सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

मुलाखतीदरम्यान सहसा विचारले जाणारे ही खालील प्रश्ने जाणून घ्या. (Most Common Job Interview Questions By HR)

१. स्वतः चा परिचय द्या

कोणत्याही मुलाखतीच्या सुरुवातीला विचारला जाणारा हा सर्वसामान्य प्रश्न आहे. याद्वारे तुमच्याबद्दल माहिती एचआरला जाणून घ्यायची असते. अशावेळी तुम्ही कंपनीच्या कामाला अनुसरुन नेमक्या शब्दात सांगायला हवे. यामध्ये मुद्देसुद बोलणे महत्वाचे असते. स्वत:बद्दल जितकी सकारात्मक माहिती देता येईल, ती देण्याचा प्रयत्न करावा.

२. तुम्ही हे क्षेत्र का निवडले?

एचआरच्या यादीत नक्कीच हा प्रश्न असतो की तुम्ही हे क्षेत्र का निवडले? यावरून तुम्हाला या क्षेत्रात खरोखरच रस आहे की नाही? हे त्यांना समजून घ्यायचे असते. या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही हे क्षेत्र निवडण्यामागचे आपले नेमके उद्दीष्ट्य, आपण या क्षेत्रात केलेले काम आणि भविष्यात करु इच्छणारे काम याचा थोडक्यात आढावा देऊ शकता.

तुमचा ड्रीम जॉब काय आहे?

जेव्हा एचआर मुलाखत घेतात तेव्हा ड्रीम जॉबबद्दलचा प्रश्न नक्कीच विचारतात. यावरून तुम्ही भविष्यात काम करण्यास किती इच्छुक आहेत हे, त्यांना कळू शकते. याचे उत्तर अतिशय काळजीपूर्वक द्या. तुम्ही जे सांगाल त्याला अनुसरुन एचआर पुढील प्रश्न विचारणार आहे हे लक्षात असू द्या.

तुम्ही कामाशी संबंधित स्ट्रेस आणि प्रेशर ला कसे हाताळता ?

हा प्रश्न विचारून एचआर तुम्ही कामाशी संबंधित स्ट्रेस आणि प्रेशर हाताळू शकता की नाही, हे समजून घेतात. त्यामुळे या संबंधित उत्तर देताना जाणीवपूर्वक विचार करून उत्तर द्यावे.

आपल्याला किती पगार अपेक्षित आहे ?

हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून ही आपल्या नोकरीचा महत्त्वाचा घटक आहे. अपेक्षित पगार मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे आपला अपेक्षित पगार व्यवस्थित सांगावा. याचे परफेक्ट उत्तर देण्यासाठी इंटरनेट वरएवरेज पगारबाबत रिसर्च करावा