New Job Tips : नवी कंपनी जॉईन करताना या गोष्टी आवर्जून पहा; नाहितर पश्चाताप करण्याची वेळ येईल

नेक दिवस रिझ्यूम घेऊन लोकांचे उंबरे झिजवल्यानंतर कुठे एखादा जॉब मिळतो
New Job Tips
New Job Tipsesakal

New Job Tips : अनेक दिवस रिझ्यूम घेऊन लोकांचे उंबरे झिजवल्यानंतर कुठे एखादा जॉब मिळतो. जॉबसाठी आता केवळ रंगवलेली कागदे नको असतात तर त्यासाठी तूमच्या इतर चांगल्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. पण, काही लोकांना त्यांच्या नव्या नोकरीची सुरुवात करण्यासाठी इतके उत्साही असतात की त्यांना इतर कशाचीही पर्वा नसते. इतर कोणत्या गोष्टीचा विचारही ते करत नाहीत.

New Job Tips
Study With Job : विद्यार्थ्यांनो नोकरीसोबत अभ्यासही करायचा 'या' स्मार्ट Tips चा करा अवलंब

जेव्हा तुम्ही तुमच्या नोकरीवर रुजू होता. तेव्हा तुमच्या घरापासून ऑफिस किती दूर आहे ते नक्की पहा. तुम्ही रोज सहज ऑफिसला जाऊ शकता का? याशिवाय तुमच्या कामाची वेळ काय आहे. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊनच नोकरीत रुजू व्हा.

New Job Tips
Job Tips : प्रमोशन हवंय? असं करा बॉसला इंप्रेस

काहीतरी वेगळं करा

काही लोक जॉब सुरू करतात. त्यांना एक विशिष्ट कार्य दिले जाते. ते फक्त तेच करत राहतात. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवावे की, ही तुमची पहिली नोकरी आहे. त्यामुळे तूम्हाला बरेच काही शिकायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात पाऊल टाकल्यावरही तुमची शिकण्याची प्रक्रिया थांबवू नका. यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल.

New Job Tips
Job News : रोजगारांच्या संधींसाठी करार

कंपनीची पॉलिसी नीट वाचा

जर तुम्ही नवीन नोकरी जॉईन करण्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करत असाल. तर तुम्ही त्यातील सर्व नियम आणि पॉलिसी वाचणे आवश्यक आहे. पहिल्यांदा कूठेतरी जॉईन होताना लोक ते वाचणे गरजेचे मानत नाहीत. परंतु ते खूप महत्वाचे आहे. कधीकधी कंपनीचे काही नियम असतात. जे नंतर तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात.

New Job Tips
Jobs : Meta आणि Twitter कंपन्यांमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना TATA ची 'ही' कंपनी करणार मदत

कपड्यांची निवड

तूम्ही घातलेल्या कपड्यातून तूमची प्रोफेशल छाप पडत असते. ज्या कार्यालयांमध्ये ड्रेस कोड नसतो. तेथे नव्यावे जॉईन झालेले लोक अनेकदा त्यांना हवे ते परिधान करतात. पण, असे करणे टाळले पाहिजे. जरी ही तुमची पहिली नोकरी असली तरी तुम्ही तुमच्या पोशाखापासून ते तुमच्या संभाषणाच्या शैलीपर्यंत आणि अगदी तुमच्या देहबोलीपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com