esakal | Success Story: गैर मुस्लीम विद्यार्थ्यानं टॉप केली इस्लामिक स्टडीजची परीक्षा!
sakal

बोलून बातमी शोधा

Shubham_Yadav

जगभरात वाढती इस्लामोफोबिया आणि वाढते धार्मिक ध्रुवीकरण पाहिल्यानंतर माझी इस्लामबद्दलची उत्सुकता वाढली. ​

Success Story: गैर मुस्लीम विद्यार्थ्यानं टॉप केली इस्लामिक स्टडीजची परीक्षा!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अलवर (राजस्थान) : मॉब लिंचिंगच्या नावाखाली अलवर हा जिल्हा देश-विदेशात बदनाम झाला आहे, पण अलवरमधीलच २१ वर्षीय शुभम यादवने सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरच्या इस्लामिक स्टडीजच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवून देशात अलवरचं नाव चांगल्या कारणासाठी चर्चेत आणलं आहे. 

इम्प्रूव्ह युअरसेल्फ :  प्रवास ध्येय गाठण्याचा...​

याबरोबरच शुभम हा देशातील पहिला बिगर काश्मिरी आणि गैर मुस्लिम तरुण ठरला आहे. शुभम म्हणाला की, मुस्लीम फोबिया आणि ध्रुवीकरणाचे वातावरण बदलण्यासाठी हा अभ्यास निवडण्याचे ठरवले होते आणि त्यात यशस्वी झालो. सध्या तो दिल्ली विद्यापीठात एल.एल.बी.चे शिक्षण घेत आहे आणि पुढे नागरी सेवेत जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. 

"जगभरात वाढती इस्लामोफोबिया आणि वाढते धार्मिक ध्रुवीकरण पाहिल्यानंतर माझी इस्लामबद्दलची उत्सुकता वाढली. सोबत मित्रांची साथही मिळाली आणि देशात पहिला बिगर काश्मिरी आणि गैर मुस्लिम ठरण्याचा मान मिळाला. एकमेकांचा धर्म समजून घेणे आणि त्यामध्ये सामंजस्य ठेवणे फार महत्वाचे आहे. दुर्दैवाने, इस्लाम आणि इस्लामिक साहित्यात खूप पुराणमतवाद आहेत. 

Success Story : पहिल्यांदा जज, मग आयपीएस त्यानंतर कलेक्टर!

"फक्त मुस्लिमांचाच नाही तर इस्लामी कायदा आणि संस्कृतीचा पाठपुरावा याचा अभ्यास यावेळी करता आला. भविष्यात मला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सुसंवादी यंत्रणेची आवश्यकता भविष्यात भासेल. यासाठी प्रशासनाला धर्माबाबतचे अधिक ज्ञान असणार्‍या लोकांची आवश्यक पडेल. आणि जर असे झाले, तर मला त्याठिकाणी काम करायला आवडेल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इस्लामी स्टडीजच्या परीक्षेत टॉप केलेल्या ९३ गैर मुस्लीम आणि बिगर काश्मिरी उमेदवारांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरने सन्मानित केले आहे.

SEBI Recruitment 2020: शंभर जागांसाठी आले १.४ लाख अर्ज!​

शुभमचे वडील प्रदीप यादव हे अलवरमध्ये किराणा दुकान चालवतात, तर त्याची आई इंदुबाला या इतिहास विषयाच्या शिक्षिका आहेत. शुभमने तत्वज्ञान आणि एलएलबीमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. इस्लामिक स्टडीजमध्ये पुढील शिक्षण घेणार नसल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ''माझी पहिली प्राथमिकता दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे पूर्ण शिक्षण करण्याकडे आहे. तसेच भविष्यात मला यूपीएससी परीक्षेची तयारीदेखील करायची आहे.''

- एज्युकेशन संबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)