SEBI Recruitment 2020: शंभर जागांसाठी आले १.४ लाख अर्ज!

टीम ई-सकाळ
Saturday, 21 November 2020

दोन संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आणि एक वैयक्तिक मुलाखत या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

SEBI Recruitment 2020: नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) मध्ये अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) १०० जागांच्या भरतीसाठी सुमारे १.४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सेबीने सर्वसाधारण, कायदेशीर, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संशोधन आणि अधिकृत भाषा प्रवाहातील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी ७ मार्च २०२० रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली होती.

पुस्तकांच्या मार्गावर चालताना...​

अर्जाची प्रक्रिया सेबीने आता बंद केली असून आपल्या वेबसाइटवर रिक्त जागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या जाहीर केली आहे. अर्जदारांच्या एकूण संख्येपैकी ५५,३२२ उमेदवार हे सर्वसाधारण प्रवर्गाचे आहेत. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या ३६२४ उमेदवारांनी सेबीत नोकरीसाठी अर्ज केला आहे.

सिव्हिल इंजिनीअरिंग पदासाठी एकूण १९७९ अर्ज भरले गेले आहेत. हे पद अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय अधिकारी (सामान्य) स्वरुपाच्या ८० रिक्त जागांसाठी सुमारे ९० हजार एवढ्या अर्जांची नोंद झाली आहे.

Success Story : पहिल्यांदा जज, मग आयपीएस त्यानंतर कलेक्टर!​

उमेदवारांची निवड कशी होईल?
दोन संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आणि एक वैयक्तिक मुलाखत या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या परीक्षेत इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील.

पहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट १७ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाईल, तर दुसरी २७ फेब्रुवारीला होणार आहे.

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SEBI receives above 1 lakh 40 thousand applications for 100 vacancies