ओमिक्रॉनमुळे विद्यापीठांची परीक्षा ऑनलाइन?

जानेवारी-फेब्रुवारीत परीक्षांचे नियोजन
Omicron causes university exams online
Omicron causes university exams onlinesakal

सोलापूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असून राज्यात ओमिक्रॉनचाही (Omicron Updates)शिरकाव झाल्याने आता जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तसा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने समितीच्या माध्यमातून त्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यावर पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित आहे. जळगाव विद्यापीठानेही तसाच निर्णय घेतला असून यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठाच्याही परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत. तत्पूर्वी, विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे परीक्षांचे नियोजन काही दिवसांसाठी पुढे ढकलावे लागले आहे.(Omicron causes university exams online)

Omicron causes university exams online
बियाणांची नासाडी टळणार ! 'श्री सिध्देश्‍वर'ची चिमुकली बनविणार "आधुनिक पेरणी मशीन'

कोरोनाची दुसरी लाट(second wave of corona) ओसरल्यानंतर विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे काही पेपर ऑफलाइन(offline) घेण्याचे नियोजन करण्यात आले. जानेवारीच्या सुरवातीला परीक्षांचे नियोजन करण्यात आले. परंतु, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली असून दुसरीकडे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा जानेवारी- फेब्रुवारी या काळात होणार आहेत. त्यासंबंधीचा एकत्रित निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत काही दिवसांत जाहीर करतील. तत्पूर्वी, विद्यापीठांनी परीक्षांचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्‍त करून त्या समितीच्या अहवालानुसार परीक्षांचे नियोजन सुरु केले आहे.(Todays Omicron News Updates in Marathi)

Omicron causes university exams online
बीड : शहेंशाहवली दर्गाची ४०९ एकर जमिन हडपल्याचा गुन्हा

ऑनलाइन परीक्षेची ठळक कारणे...

  • मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाढले कोरोनाचे रुग्ण

  • राज्यातील एक कोटींहून अधिक व्यक्‍तींनी विशेषत: तरुणांनी प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतला नाही

  • पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण होऊनही जवळपास 85 लाख व्यक्‍तींनी घेतला नाही दुसरा डोस

  • 13 अकृषिक विद्यापीठाअंतर्गत अंदाजित 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा सद्यस्थितीत अशक्‍यच

  • ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन परीक्षेत रिस्क कमी; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन ऑनलाईनचा निर्णय

Omicron causes university exams online
नाशिक : ऑनलाइन गंडविलेले ४० हजार परत

सोलापूर विद्यापीठाची फेब्रुवारीत परीक्षा

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2020 मधील परीक्षा कोरोनामुळे 17 जानेवारीपासून घेण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आणि ओमिक्रॉनच्या नव्या संकटामुळे ही परीक्षा आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. तत्पूर्वी, पदवी, पदव्युत्तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन आणि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या सत्र एक व दोनमधील प्रत्येकी एक पेपर ऑनलाइन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. उर्वरित शाखांच्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पहिला पेपर ऑफलाइन घेण्याचा निर्णयही झाला होता. परंतु, आता फेब्रुवारीत सर्वांचीच परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन झाल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com