
PCMC Recruitment 2023 : परीक्षा न देता थेट मुलाखत, १२ वी पास लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी
PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेवर गट क मधील वेगवेगळ्या पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पदे थेट मुलाखतीद्वारा भरले जाणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करत अर्जासह उमेदवाराने मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखत ९ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
पद संख्या - २
शैक्षणिक पत्रता -
आरोग्य पदासाठी - १२ वी पास आणि शासनमान्य संस्थेकडून सॅनिटरी इन्स्पेक्टरची पदवी उत्तीर्ण असावा. शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमध्ये समक्ष पदाच्या कामाचा कमीत कमी ६ महिन्यांचा अनुभव असावा. मान्यता प्राप्त शासकीय संस्थेची संगणक आर्हता असावी. मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे.
निरीक्षक पदासाठी - मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पडवी असावी. सॅनिटरी इन्पेक्टरची पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे. यात सहा महिन्यांचा अनुभव असावा शिवाय संगणक व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
मुलाखतीचा तारीख - ९ जून २०२३
वेळ - सकाळी १० वाजता
पत्ता - दिवंगत मधुकर पवळे सभागृह, तिसरा मजला, मुख्य इमारत, पिंपरी चिंचवड महापालिका.
आवश्यक कागदपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्र
अनुभवाच्या आवश्यक आणि साक्षांकीत प्रती
गुमपत्रिका, प्रमाणपत्र यांच्या ओरीजनल कॉपी.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची अधिकृत वेबसाइट बघावी.
महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
अनुभवाचा दाखला खोटा आढळल्यास अपात्र ठरवण्यात येईल.