पुणे वैद्यकीय महाविद्यालयाची सेवा प्रवेश नियमावली तयार

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सध्या अधिष्ठातांसह सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत.
medical college
medical collegesakal
Summary

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सध्या अधिष्ठातांसह सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत.

पुणे - पुणे महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय यंदापासून सुरू झाल्यानंतर आता या ठिकाणी कायमस्वरूपी प्राध्यापक व इतर महत्त्वाची पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून, आता ही नियमावली राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. ही नियमावली सुमारे ६०० पदांसाठी असणार आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सध्या अधिष्ठातांसह सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत. त्यांना ठराविक कालावधी पुरते नियुक्त केल्याने दरवर्षी त्यांची नवे प्राध्यापक, तांत्रिक पदावरील कर्मचारी भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. या महाविद्यालयात कायम स्वरुपी डॉक्टर, प्राध्यापक नियुक्त करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सेवा प्रवेश नियमावली तयार केली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘वैद्यकीय महाविद्यालयासाठी सेवा प्रवेश नियमावली तयार केली आहे. त्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. आता शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर तेथे अधिष्ठाता, प्राध्यापक यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाईल. त्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविली जाईल. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्राध्यापक व कर्मचारी वर्ग राष्ट्रीय वैद्यक परिषदेच्या (एनएमसी) निकषांनुसार नेमण्यात येतात, त्यानुसारच याचे नियम तयार केले आहेत.

खरेदीचे अधिकार अधिष्ठातांकडे

वैद्यकीय महाविद्यालयात आवश्‍यक छोटी उपकरणे, आवश्‍यक शैक्षणिक साहित्य, वस्तू याची खरेदी करण्याचे अधिकार अधिष्ठातांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेल्या गोष्टींची लवकर खेरदी करता येईल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आमचे लक्ष आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे कुमार यांन सांगितले.

नायडूच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू

वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुणे स्टेशन येथील नायडू रुग्णालयाच्या जागेत इमारत बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १६६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे याठिकाणचे नायडू रुग्णालय बाणेर येथील कोवीड जम्बो रुग्णालय एक येथे स्थलांतर करण्याची प्रक्रिया टप्प्याने केले जाणार आहे, असे कुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com