esakal | लष्करातर्फे आजपासून भरती; ऑनलाईन अर्ज ९ जुलैपासून सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

army recruitment

लष्करातर्फे आजपासून भरती; ऑनलाईन अर्ज ९ जुलैपासून सुरु

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : लष्करातर्फे पुरुष उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून, प्रवेश पत्र मिळवणे आवश्‍यक आहे. प्रवेश पत्राशिवाय भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभाग घेता येणार नाही. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. ९) सुरू होणार आहे. याबाबतची जाहिरात सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Recruitment by Army starts from today Online application starts from 9th July)

हेही वाचा: इंडियन नेव्हीमध्ये मॅट्रिकच्या भरतीसाठी अधिसूचना जारी !

ही भरती प्रक्रिया तांत्रिक, वैद्यकीय अशा विविध विभागात सोल्जर पदासाठी असून, यासाठी वयोमर्यादा साडे १७ ते २३ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. तसेच आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना यात सहभाग घेता येणार आहे. ही प्रक्रिया पुणे, लातूर, नगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर येथील उमेदवारांसाठी ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानात पार पडणार आहे.

हेही वाचा: UPSC Cmx Exzam : असा करा अर्ज; अधिसूचना जारी

भरती प्रक्रियेबाबतच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे तर उमेदवार २२ ऑगस्टपर्यंत अर्ज भरू शकतात. अर्ज केल्यावर उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर प्रवेश पत्र पाठवण्यात येईल.

loading image