esakal | Govt Jobs: महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात भरती
sakal

बोलून बातमी शोधा

Govt_Maharashtra

वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Govt Jobs: महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात भरती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा असून या जागांवर भरती करण्यात येणार आहे. गट- क आणि गट- ड मधील सरळसेवेतून ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नागपूर, पुणे आणि कोल्हापूर येथील विभागात सदर भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी २८ डिसेंबर २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच पोस्ट, कुरिअर किंवा आणखी कोणत्या मार्गाने पाठवलेले अर्ज दिलेल्या मुदतीत न पोहोचल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता -
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, मुंबई ४००००१.

Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

असिस्टंट (जतन सहाय्यक)
पद - १ 
वेतन - ३५,४०० ते ११२४००
पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवीका आवश्यक
अनुभव - तसेच शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव

फोटोग्राफर 
पद - १ 
वेतन - २९,२०० ते ९२३००
पात्रता - दहावी किंवा समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 
अनुभव - शासन मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणाचे (फोटोग्राफी) प्रमाणपत्र
- फोटोग्राफी तसेच छपाई (प्रींटिंग) शासकीय निमशासकीय किंवा खाजगी क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव 

UPSC Recruitment 2020: यूपीएससीने विविध विभागात काढली भरती; असे करा अर्ज​

माळी 
पद संख्या - १ 
वेतन -  १५,००० ते ४७,६००
पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 
अनुभव - शासकीय, निमशासकीय / खाजगी कृषी विद्यापीठातून पदविका किंवा कृषी पदवीचे प्रमाणपत्र.

पहारेकरी
पद - १ 
वेतन - १५,००० ते ४७,६००
पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 
शारीरिक पात्रता - उंची १६५ सेमी, वजन ५० किलो आणि छाती फुगवून ८४ सेमी आणि न फुगवता ७९ सेमी

SAIL Recruitment 2021: स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियात भरती; ९ जानेवारीपर्यंत करा अर्ज!​

वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. आणि या भरती प्रक्रियेची जाहिरात पाहिल्यानंतरच अर्ज दाखल करावा, असा सल्ला देण्यात येत आहे. 

- महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे ►क्लिक करा

- जाहिरात पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top