Bank Recruitment 2022:सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये Interview द्वारे होणार थेट भरती, 500 पेक्षा जास्त पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

central bank of india

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये Interview द्वारे होणार थेट भरती, 500 पेक्षा जास्त पदे रिक्त

Bank Recruitment 2022: बँकिग सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) काही रिजनल आणि झोनल भरतीसाठी जाहीरात दिली आहे. 535 रिक्त पदांसाठी भरती होणार असून २८ फेब्रुवारीला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी जाहिरात जाहीर केली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रिक्त पदांसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात जे बँकेतून रिटायर झाले आहेत आणि त्यांचे वय ६३ पेक्षा जास्त नसले पाहिजे. (Recruitment through Central Bank of India interview more than 500 vacancies)

हेही वाचा: NDA अंतर्गत होणाऱ्या SSB च्या मुलाखती पुढील महिन्यापासून सुरु

रिक्त पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बँक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची निवड १ वर्षाच्या कराराच्या आधारे केली जाईल. जर निवड झालेला उमेदवारांची कामगिरी चांगली असेल तर ६५ वर्षांपर्यंत त्यांच्या सेवेमध्ये वाढ होऊ शकतो.

अर्ज करण्यासाठी कँडीडेट्स अधिकृत वेबसाईटवर centralbankofindia.co.in ला भेट देऊ शकतात. येथूनच ते नोटिफिकेशन देखील डाऊलडोल करू शकतात.

हेही वाचा: MPSC Exam: संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार

अर्जाचा फॉर्म भरून नोटिफिकशेनमध्ये दिलेल्या पत्यावर पाठवावा लागेल आणि त्यासोबत ५९० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागेल. हा डिमांड ड्राफ्ट सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनेल आणि मुंबईमध्ये Payable असेल.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो. जर अर्जामध्ये ब्लूकी पाई असेल तर तो अर्ज रद्द करेल. मुमुलाखतीसाठी उमेदवारांची निवड अर्जाच्या छाननीच्या आधारे केली जाईल.

Web Title: Recruitment Through Central Bank Of India Interview More Than 500 Vacancies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..