SBI Clerk mains Result 2020: मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; येथे पाहा निकाल!

टीम ई-सकाळ
Saturday, 26 December 2020

जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत, त्यांना लवकरच नियुक्तीसाठी बोलावण्यात येणार आहे.

SBI Clerk Mains Result 2020: नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI)ने लिपिक (कनिष्ठ सहकारी) मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा दिलेले उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचे निकाल तपासू शकतात. 
एसबीआयतर्फे ८००० रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामध्ये ७८७० नियमित पदे आणि १३० विशेष पदे भरण्यात येणार आहेत. एसबीआय लिपिक मुख्य परीक्षा ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती.

SBI PO 2020: स्टेट बँक पीओ परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर; असं करा डाउनलोड​

यासंदर्भात एसबीआयकडून अधिकृत नोटीस जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये मुख्य परीक्षा 2020 चा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर होईल, असे अगोदरच सांगण्यात आले होते. जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत, त्यांना लवकरच नियुक्तीसाठी बोलावण्यात येणार आहे. लिपीक आणि कनिष्ठ सहकारी पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षा पात्र ठरल्यानंतर मुलाखत देण्याची गरज भासत नाही. त्यांची थेट नेमणूक करण्यात येते. ज्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली आहे, ते उमेदवार sbi.co.in वर त्यांचा निकाल ऑनलाईन पाहू शकतात.

VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

असा पाहा निकाल 
- मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांचे निकाल पाहण्यासाठी एसबीआयच्या sbi.co.in/careers च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- होम पेजवर ज्यूनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर मागितलेली माहिती प्रविष्ट करा. 
- एसबीआय लिपिक मुख्य २०२० चा निकाल पीडीएफ फॉरमॅटमध्ये दिसेल.
- उमेदवारांनी त्यांचा निकाल डाउनलोड करुन तो प्रिंट करुन घ्यावा.

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

निकालाची पीडीएफ पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Clerk Mains result 2020 declared check how to download scorecard

Tags
टॉपिकस
Topic Tags: