SBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती

SBI
SBI

SBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

देशातील सर्व राज्यांमध्ये जागा भरण्यात येणार आहेत. पुढे या रिक्त जागांचा तपशील दिला आहे. यासह अधिसूचना आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या लिंकही दिल्या आहेत.

पदाचे नाव - अप्रेंटिस
पदांची संख्या - 8500

कोणत्या राज्यात किती पदे - 
गुजरात - 480 पदे
आंध्र प्रदेश - 620
कर्नाटक - 600
मध्य प्रदेश - 430
छत्तीसगड - 90
पश्चिम बंगाल - 480
ओडिशा - 400
हिमाचल प्रदेश - 130
हरियाणा - 162
पंजाब - 260
तामिळनाडू - 470
पुदुच्चेरी - 06
दिल्ली - 07
उत्तराखंड - 269
तेलंगणा - 460
राजस्थान - 720
केरळ - 141
उत्तर प्रदेश - 1206
महाराष्ट्र - 644
अरुणाचल प्रदेश - 25
आसाम - 90
मणिपूर - 12
मेघालय - 40
मिझोरम - 18
नागालँड - 35
त्रिपुरा - 30
बिहार - 475
झारखंड - 200

पात्रता - 
भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

असा करा अर्ज -
या रिक्त पदांसाठी एसबीआय करिअर वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करा. 20 नोव्हेंबर 2020 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.

अर्जासाठी फी -
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्जाची फी 300 रुपये आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.

अशी होईल निवड - 
ऑनलाईन लेखी परीक्षा आणि प्रादेशिक भाषा परीक्षा या माध्यमातून एसबीआय अप्रेंटिस पदासाठी निवड केली जाणार आहे.

वेतन - 
निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा १५ हजार रुपये वेतन मिळेल. दुसर्‍या वर्षी दरमहा १६ हजार पाचशे रुपये आणि तिसर्‍या वर्षी दरमहा १९ हजार रुपये वेतन दिले जाईल. इतर कोणत्याही भत्ते किंवा लाभासाठी उमेदवार पात्र नसतील.

महत्त्वाच्या लिंक-  
- SBI अ‍ॅप्रेंटिस नोटिफिकेशन 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- SBI करिअर वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com