SBI Recruitment: आज शेवटची संधी; स्पेशालिस्ट केडर ऑफिसरसाठी लगेच करा अर्ज

टीम ई-सकाळ
Monday, 11 January 2021

स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू झाली होती.  

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या ४८९ पदाची भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करावेत. 

स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू झाली होती. आज ही मुदत संपत आहे. त्यामुळे उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावेत.

 UPSC Recruitment 2021: सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदासाठी निघाली भरती​ 

१. व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक विपणन - ३८ पदे
एसबीआय एससीओ भरती २०२१ अंतर्गत मॅनेजर (मार्केटिंग) आणि डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) यांच्या एकूण ३८ जागांवर भरती करण्यात येणार आहे. मार्केटिंग किंवा फायनान्समध्ये एमबीए किंवा पीजीडीबीएम केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

२. मॅनेजर क्रेडिट प्रोसिजर - २ पदे
एसबीआय मॅनेजर क्रेडिट प्रोसिजरची एकूण २ पदे भरण्यात येणार आहेत. एमबीए किंवा पीजीडीबीएम केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

UPSC CDS(I) 2021: कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; लगेच करा डाउनलोड

३. सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि इतर - २३६ पदे
एसबीआयने सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, आयटी सुरक्षा अ‍ॅक्टपर्ट, प्रकल्प व्यवस्थापक, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड अशी २३६ पदे याद्वारे भरण्यात येणार आहेत. 

४. सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) आणि उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) - १०० पदे
स्टेट बँक ऑफ इंडियाने सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) आणि उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) यांच्या एकूण १०० पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचना सविस्तर वाचावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी​

अधिसूचना (Notification) पुढीलप्रमाणे-

- मॅनेजर क्रेडिट प्रोसिजर येथे ► क्लिक करा 
- सुरक्षा विश्लेषक येथे ► क्लिक करा
- सहाय्यक व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक येथे ► क्लिक करा
- इतर येथे ►
 क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI SO Recruitment 2021 Apply Online For 452 Vacancies For SCO and Manager Posts