esakal | राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीमध्ये "अशी' मिळवू शकता नोकरी ! जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया व पगार

बोलून बातमी शोधा

NIA
राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीमध्ये "अशी' मिळवू शकता नोकरी ! जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया व पगार
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए) ही दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि संबंधित बाबींची चौकशी करणारी भारतातील मुख्य एजन्सी आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर संसदेत 31 डिसेंबर 2008 रोजी पारित केलेल्या कायद्यानुसार एनआयएची स्थापना झाली. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या एनआयएची हैदराबाद, गुवाहाटी, कोची, लखनऊ, मुंबई, कोलकाता, रायपूर आणि जम्मू येथे शाखा कार्यालये आहेत. जवळजवळ प्रत्येक तरुण एनआयएमध्ये सरकारी नोकरी मिळवू इच्छितो. आव्हानात्मक, मिशन-आधारित आणि जोखमीचे कार्य प्रोफाइल शोधत असलेल्या तरुणांची एनआयएमध्ये सरकारी नोकरीची ही पहिली पसंती आहे, जिथे त्यांना चांगले करिअर आणि प्रतिष्ठा मिळते. तसेच देशाची सेवा करण्याची संधी मिळते. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीमध्ये आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळू शकते आणि यासाठी पात्रता आणि निवड काय आहे, ते जाणून घ्या.

एनआयएमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सर्वात लोकप्रिय संधी म्हणजे उपनिरीक्षक म्हणून भरती. एनआयएमध्ये उपनिरीक्षकाच्या पदावर भरती प्रक्रिया कर्मचारी निवड आयोग (एसएससी) घेते. एनआयएमधील एसआयची भरती एसएससीद्वारे जॉइंट ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) परीक्षेत होते. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एसएससी सीजीएल परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमधील गट बी आणि गट सीच्या घोषित रिक्त पदांच्या जागांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड केली जाते, त्यापैकी एनआयए (ग्रुप बी) पोस्टमधील एसआय देखील समाविष्ट आहे.

हेही वाचा: रेल्वे मंत्रालयाची राईट्‌स कंपनी करणार विविध पदांची भरती ! "असे' करा ऑनलाइन अर्ज

एनआयएमधील सब-इन्स्पेक्‍टरच्या पदांवर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना एसएससी सीजीएल परीक्षेस हजेरी लावावी लागेल. एसएससी सीजीएल परीक्षेस बसण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेत पदवीधर ही पात्रता आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये आरक्षित विभाग ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत, अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षे, दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षे सवलत आहे.

एसआयसीतर्फे एनआयएमध्ये उपनिरीक्षकाच्या थेट भरतीसाठी घेण्यात आलेल्या सीजीएल परीक्षेत टियर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4 असे चार टप्पे असतात. टियर 1 आणि टियर 2 परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात सामान्य माहिती, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, स्टॅटिस्टिक्‍स आदी प्रश्न विचारले जातात. या टप्प्यात यशस्वी उमेदवारांना टियर 3 लेखी परीक्षेस हजेरी लावावी लागते,, ज्यामध्ये उमेदवारांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतील तपशीलवार प्रश्न (निबंध / सार / पत्र / आवेदनपत्र आदी) सोडवावे लागतात. तर अंतिम टप्पा म्हणजे टियर 4 मधील संगणक प्रवीणता चाचणी / डेटा एंट्री कौशल्य चाचणी असते. सीजीएल परीक्षेच्या विविध टप्प्यांसाठी निर्धारित अभ्यासक्रमाची माहिती अधिसूचनेवरून मिळू शकते. सर्व टप्प्यात यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रक्रियेसाठी आयोग संबंधित विभागांना पाठतो.

हेही वाचा: "सीबीएसई'ने 2022 च्या परीक्षांचे बदलले स्वरूप ! आता रट्टामार चालणार नाही

एनआयमधील सब-इन्स्पेक्‍टरची नियुक्ती गट बी स्तरावर केली जाते, ज्यावर कार्यरत असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्‍स लेव्हल 6 (35,400 ते 1,24,400 रुपये) नुसार दरमहा वेतन दिले जाते. याशिवाय इतर अनेक मासिक भत्ते व सुविधादेखील दिल्या जातात.