SSC स्टेनो भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, कसा पाहायचा निकाल ? अधिक जाणून घ्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC स्टेनोग्राफर ग्रेड-सी आणि डी भरती

SSC स्टेनो भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, कसा पाहायचा निकाल ? अधिक जाणून घ्या..

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) स्टेनोग्राफर ग्रेड-सी आणि डी भरती, 2019 साठी कागदपत्र पडताळणी निकाल जाहीर केलेत. एसएससीची अधिकृत वेबसाइट अर्थात ssc.nic.in वरुन स्टेनोग्राफर ग्रेड-सी आणि डी भरतीच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत सहभागी झालेले उमेदवार रिझल्ट डाउनलोड करू शकतात. हे निकाल PDF मध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: शालेय विद्यार्थ्यांचा गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा

निकाल कधी होतील अपलोड ?

SSC द्वारे भरतीसाठी निवडलेल्या आणि अनुत्तीर्ण उमेदवारांचे स्कोअरकार्ड येत्या 4 दिवसांत अर्थात 31 मे 2022 रोजी अधिकृत वेबसाइटवर ( ssc.nic.in ) अपलोड केले जातील. हे निकाल 21 जून 2022 पर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असतील.

हेही वाचा: India Post Recruitment 2022: पोस्ट विभागाने 650 पदांसाठी मागवले अर्ज; पगार 30,000 रुपये

किती जणांची निवड ?

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) 25 ते 27 एप्रिल 2022 रोजी स्टेनो भरतीसाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आयोजित केली होती. गट क साठी 161 आणि गट ड साठी 2101 उमेदवार यात सहभागी झाले. अधिकृत पीडीएफ नुसार, स्टेनोग्राफर गट 'क'साठी 26 उमेदवारांची तर गट 'ड'साठी 473 निवड उमेदवारांची निवड केली आहे.

हेही वाचा: NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी का करत आहेत ? पाहा...

निकाल कसा पाहायचा ?

- अधिकृत वेबसाइटवर अर्थात ssc.nic.in वर जा.

- होम पेजवर दिसणार्‍या स्टेनो रिक्रूटमेंट निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.

- निकाल PDF स्वरूपात दिसेल.

- Ctrl+F दाबून तुमचा रोल नंबर तपासा.

- निकाल डाउनलोड करा आणि आवश्यकतेनुसार प्रिंट काढा.

Web Title: Ssc Stenographer Exam Result Declared Follow The Process To Check Result

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :examsscResultJob News
go to top