esakal | दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा
sakal

बोलून बातमी शोधा

akshat jain

वयाच्या 23 व्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्णच झाला नाही तर भारतात दुसरा क्रमांकही पटकावला. 

दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अनेक तरुण तरुणी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने तयारी करतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं तर अनेकांना कित्येकवेळा अपयशाला सामोरं जावं लागतं. मात्र यातही न खचता पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागतात. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच युपीएससीची परीक्षा पास करून अधिकारी झाले आहेत. इथं वयापेक्षा तुमचा अभ्यास आणि परीक्षा, मुलाखत यांना सामोरं जाताना क्षमतेचा विचार केला जातो. 

हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

वयाच्या तेविसाव्या वर्षी सव्वा वर्ष अभ्यास करून UPSC उत्तीर्ण झालेल्या एका अधिकाऱ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. फक्त उत्तीर्णच झाला नाही तर भारतात दुसरा क्रमांकही पटकावला. त्याचं नाव आहे अक्षत धरमचंद जैन. वयाच्या तेविसाव्या वर्षी युपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या अक्षत यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहेत. यानंतर त्यांनी आई वडिलांच्या प्रेरणेतून युपीएससी करण्याचा निर्णय घेतला. अक्षतचे कुटुंब मूळचे टोंक येथील आहे. त्यांचे वडील राजस्थानात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर काम करत आहेत. 

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इंट्रेस्टिंग करीअर; 'या' आहेत संधी

UPSC करण्याचा निश्चय केल्यानंतर त्यादिशेने वाटचालही केली. कठोर मेहनत आणि जिद्दीला त्यांनी सकारात्मक प्रयत्नांची जोड दिली आणि यशाला गवसणी घातली. अक्षत यांचे वडील पोलिस सेवेत तर आई प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. अभियांत्रिकीची आवड असलेल्या अक्षतने आधी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने युपीएससीचा अभ्यास सुरू केला. 

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा
अक्षतने पहिल्यांदा तीन महिने अभ्यास केल्यानंतर एकदा युपीएससीची परीक्षा दिली. तेव्हा केवळ 2 गुणांसाठी त्याची संधी गेली. पुढे वर्षभरात त्यानं पुन्हा जोमाने अभ्यास केला. त्यानंतर 2018 ला झालेल्या परीक्षेत त्यानं भारतात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दाखवले.