बारावीनंतर इंजिनिअरिंग करायचे आहे? 'या' शाखेत आहे सुवर्ण संधी

Electrical-Engineering
Electrical-Engineering

बारावीनंतर सगळ्यात मोठा प्रश्न ज्यांच्यासमोर उभा असतो, ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी. अनेकांना हेच कळत नाही की, कोणत्या जायचं? तुम्हाला  इंजिनियरिंगच्या क्षेत्रामध्ये  करियर करायची इच्छा असेल, तर इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ही चांगली शाखा आहे. नोकरीच्या संधी आणि औद्योगिक क्षेत्रात मागणी, स्वयंरोजगाराची संधी याचा हा संतुलित कोर्स  आहे. घरापासून ते औद्योगिक आणि अंतराळ क्षेत्रापर्यंत प्रत्येक  क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची मागणी ही  असतेच.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या जीवनात  आधुनिक मशीन आणि गॅजेटचा वाढता वापर या कारणाने ही उपकरणे आता जास्त सक्षम, नियंत्रणयोग्य बनविणे ही आता काळाची गरज बनली आहे. या आधुनिक उपकरणांचा वाढता वापर आणि त्याच्या मागणीमुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या कोर्सकडे आता रोजगार मिळून देण्याचा चांगला पर्याय म्हणून  बघितले जाते. 

‌डिप्लोमा कोर्स -
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा करता येतो आणि तुम्ही दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हा कोर्स करू शकता. त्याचा कालावधी तीन वर्षांचा आहे. 

‌पदवी अभ्यासक्रम चार वर्षे या कालावधीचा आहे.  तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये  बी. टेक. किंवा बी. ई. ही पदवी मिळते. हा कोर्स तुम्ही बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता. 

‌पदव्युत्तर अभ्यासक्रम -
हा कोर्स दोन वर्षे कालावधी चा असतो. त्यानंतर एम. टेक. किंवा एम. ई. ही पदवी मिळते.  त्यापूर्वी तुमच्याकडे  बी. टेक. किंवी बी. ई. पदवी असणे आवश्यक आहे. 
पुढे तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात संशोधन  करून   पीएचडी पदवी मिळवू शकता. 

कुठल्या नव्या क्षेत्रांमध्ये आहे रोजगाराची संधी -
1) खासगी क्षेत्र -
‌सध्याच्या डिजिटल युगात  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्र सेमीकंडक्टर, नेटवर्किंग, कम्युनिकेशन नेव्हिगेशन सिस्टम, कॉम्प्युटर एंड डाटा अॅनालिसिस अशा क्षेत्रांमध्ये आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्येसुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरची निवड बऱ्याच प्रमाणात होते. 

डाटा डिजिटाइजेशन सेक्टर -
सध्याची सरकारे ही आता व्यक्तिगत माहिती डिजिटायजेशन आणि  नेटवर्क वाढवण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिकल इंजिनियरला नेटवर्क आणि कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळते. 

2.) सरकारी क्षेत्र - भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल), पावर ग्रिड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीजीसीआईएल),  स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन (इसरो), नॅशनल थर्मल पावर कॉरपोरेशन लिमिटेड (एनटीपीसी), एनएसपीसीएल, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (महावितरण, महापरिक्षण, महानिर्मिती), गेल आदी 

‌इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये संशोधनाची संधी -
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पदवीधारकांसाठी विविध संस्था आणि कंपन्या आता  नव्या क्षेत्रांमध्ये  रिसर्चसाठी गुंतवणूक करत आहेत. या पैकी काही क्षेत्र जसे डिस्ट्रिब्यूटेड ग्रिड कंट्रोल, स्मार्ट ग्रिड, अपारंपरिक उर्जा स्रोत, ऑइल आणि  गॅस निर्मितीचे काम असे काही उर्जा सेक्टरमध्ये अनेक रिसर्च प्रोजेक्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरला  मिळतात.
शेवटी जिथे जिथे विजेचा संबंध येतो, त्या त्या क्षेत्रा इलेक्ट्रिकल इंजिनिअरला मागणी असते. कारण आज अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्या सोबत वीज ही एक दैनंदिन गरज झाली आहे. 

- विवेक माळवदे (जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com