UGC NET 2023 Result: नेट परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

या परीक्षेला सुमारे ६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
NET Exam Result File Photo
NET Exam Result File Photosakal

UGC NET 2023 Result : युजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या सर्वांना परीक्षेचा निकाल ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन चेक करता येईल. (UGC NET 2023 Result Declared know how can you See the result)

NET Exam Result File Photo
INDIA vs NDA: शहरांची नाव बदलण्यासाठी फेमस असणारे CM योगी म्हणतात, "नाव बदलून काय होणार?"

६ जुलै रोजी युजीसीनं या परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध केली होती. त्यावर ८ जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. यानंतर आता तज्ज्ञांकडून या आक्षेपांची फेरपडताळणी करुन मग फायनल उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

NET Exam Result File Photo
Trishna Vishwasrao: "मुख्यमंत्री इर्शाळवाडीत डोंगर चढून गेल्यानं प्रभावित"; माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

युजीसी नेट २०२३ परीक्षेचं ८३ विषयांसाठी देशभरातील १८१ शहरांत आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी ६,३९,०६९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दोन टप्प्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील परीक्षा १३ जून ते १७ २०२३ या काळात तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १९ जून ते २२ जून या काळात पार पडली होती.

NET Exam Result File Photo
Manipur Violence: मणिपूर शांती अन् विकास अनुभवत होता, पण कोर्ट...; शहांचं विरोधकांना पत्र

असा पाहा निकाल

  1. सुरुवातीला ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर जा

  2. इथं जून २०२३ स्कोअरकार्डच्या लिंकवर क्लीक करा

  3. या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक, जन्म तारीख आणि पिन टाका

  4. यानंतर सबमिट बदन दाबा

  5. युजीसी नेट जून रिझल्ट २०२३ स्क्रीनवर दिसेल

  6. यानंतर स्कोअरकार्ड डाऊनलोड करा त्याची प्रिंट आऊट घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com