UPSC च्या उमेदवारांना सूट मिळणार? सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला निर्णय

Supreme_Court
Supreme_Court

UPSC prelims 2021: नवी दिल्ली/ पुणे : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. या काळात सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. यापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) देणारे उमेदवारही सुटले नाहीत. त्यांनाही कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला. यामुळे काही उमेदवारांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. ज्या उमेदवारांचे परीक्षा देण्याचे हे शेवटचे वर्ष होते त्यांना सर्वात जास्त फटका बसला. परिणामी, काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवारांना एक अतिरिक्त वर्ष सवलत देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी लावून धरली होती. सोमवारी (ता.८) सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबाबत विचारणा केली होती. यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या आणि वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना आणखी एक वर्ष वाढवून देण्यात यावे का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला. 

दरम्यान, नागरी सेवा पूर्वपरीक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली होती. कोरोनामुळे काही उमेदवारांना या परीक्षेला जाता आले नाही. प्रवास तसेच इतर काही गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला होता. त्यामुळे आपली शेवटची संधी हातून गेल्याची भावना काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. अशा उमेदवारांना आणखी एक संधी देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. 

या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. पक्षकारांना बुधवारपर्यंत लेखी युक्तिवाद दाखल करण्याचे आदेश दिले असून केंद्र सरकारलाही पुन्हा एकदा विचार करण्याबाबत सूचना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर, दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण
ज्या उमेदवारांचे सर्व अटेम्प्ट संपलेले आहेत, फक्त अशाच उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास केंद्र सरकारची तयारी आहे. मात्र, यावेळी उमेदवाराने आपल्या वयोमर्यादा ओलांडलेली नसावी, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी देणे शक्य नसल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही.राजू यांनी केंद्र सरकारतर्फे सांगितले. वयाची सवलत दिल्यास २२३६ उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com