एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

उच्च शिक्षण घेतल्यानंतर परदेशातली एक कोटी रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली. भारतात परतल्यावर युपीएससीचा अभ्यास सुरु केला.

नवी दिल्ली - युपीएससीच्या परीक्षेतून देशाची सेवा करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. त्यासाठी देशातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थी, तरुण प्रयत्नशील असतात. एक चांगलं करिअर, प्रतिष्ठा आणि देशाची सेवा म्हणून युपीएससीकडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो. यामध्ये असेही काही असतात जे देशाच्या सेवेसाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून येतात. कनिष्क कटारिया हेसुद्धा त्यातलंच एक नाव. आयएएस अधिकारी होण्याआधी त्यांनी दक्षिण कोरियामध्ये एक कोटी रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली. भारतात परतल्यावर युपीएससीचा अभ्यास सुरु केला. पहिल्याच प्रयत्नात कनिष्कने 2018 मध्ये युपीएससीमध्ये यश मिळवलं आणि तो टॉपरही बनला.

दुसऱ्या प्रयत्नात झाला IAS, अधिकारी होण्यासाठी आई वडिलांनी दिली प्रेरणा

राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणारा कनिष्क हा दहावी बारावीतसुद्धा 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्यानंतर आयआयटीमध्ये 44 वी रँक मिळवली होती. बॉम्बे आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला दक्षिण कोरियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण कनिष्कला फक्त पैसे कमवायचे नव्हते. त्याला आयएएस अधिकारी होऊन समाजातील गरीब आणि तळागाळातील लोकांसाठी काम करायचं होतं. 

हे वाचा : खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

घरचं वातावरण अभ्यासाचं आणि सिव्हिल सर्विसचं असल्यानं कनिष्कला युपीएससीमध्ये मदत झाली. त्याचे वडिल आणि काका दोघेही आयएएस अधिकारी होते. त्यांच्याकडूनच कनिष्कला ही प्रेरणा मिळाली. दक्षिण कोरियातून भारतात आल्यावर त्यानं तात्पुरती एक नोकरीसुद्धा केली. मात्र त्याचे लक्ष आयएएस होण्याकडे होते. 

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इंट्रेस्टिंग करीअर; 'या' आहेत संधी

युपीएससी्या तयारीसाठी कनिष्कने दिल्लीत क्लासही लावले. परीक्षेचा पॅटर्न समजण्यासाठी आणि गणिताची तयारी करण्यासाठी क्लास लावावे लागले असं तो म्हणतो. याशिवाय सेल्फ स्टडीसुद्धा महत्वाचा ठरला. दबाव न घेता एक आव्हान म्हणून युपीएससीकडे पाहिले. तसंच हे सर्व करताना छंदही जोपासले असंही कनिष्क म्हणतो.

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

छंद जोपासल्याने त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. दररोज जवळपास दहा तास अध्यास करून आणि वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स काढल्यानं थोडं सोपं गेलं. हल्ली सोशल मीडियामुळे डिस्ट्रॅक्शन होतं असं म्हणतात पण अभ्यास करताना सोशल मीडियावरून दूर नव्हतो. यातूनही अनेक अपडेट मिळायचे. मित्रांशी संपर्क करून नोट्स शेअऱ करता यायच्या असं कनिष्क म्हणतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc topper kanishka kataria left foreign job and start study