DMVS: दिल्लीत सुरू झाली जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा; जाणून घ्या वैशिष्ट्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

DMVS: दिल्लीत सुरू झाली जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Delhi Model Virtual School Begins Today : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात खास आणि वेगळी घोषणा म्हणजे जगातील पहिली आभासी (व्हर्च्युअल) शाळा उघडण्याची आहे. दिल्लीची पहिली आभासी शाळा किंवा देशातील पहिली आभासी शाळा, दिल्ली मॉडेल व्हर्च्युअल स्कूल आजपासून सुरू झाली आहे. या शाळेचे दरवाजे सर्वांसाठी खुले असणार आहे. त्यामुळे देशातील कोणतेही मूल या शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेऊ शकणार आहे.

तसे बघितले गेल्यास व्हर्च्युअल किंवा ऑनलाइन क्लासचे मॉडेल प्रथम कोरोनाच्या काळात समोर आले होते. त्याकाळात ही पद्धत ऑनलाईन क्लासेससाठी वापरण्यात आली होती. परंतु आता हे मॉडेल इतर गोष्टींसह लॉन्च करण्यात आले आहे. त्यानुसार या शाळेत वर्ग ऑनलाइन होणार असून, डिजिटल लायब्ररीतील इतर सर्व आवश्यक सुविधा केवळ ऑनलाइनच उपलब्ध असणार आहे. ही शाळा गुगल आणि इंडिया नेट प्लॅटफॉर्मने तयार केली असून, यामध्ये देशभरातील 13 ते 18 वर्षे वयोगटातील मुले प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत.

शाळेची वैशिष्ट्ये काय ?

  • या शाळेत इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे.

  • कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमही येथे चालवले जाणार असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकणार आहे.

  • ही शाळा प्रामुख्याने अशा मुलांसाठी आहे जे कोणत्या ना कोणत्या कारणाने अभ्यासापासून दूर आहेत.

  • या शाळेत मुले एकतर थेट वर्गांना उपस्थित राहू शकतात किंवा त्यांच्या आवडीनुसार रेकॉर्डिंग पाहू शकणार आहेत.

  • ही शाळा इयत्ता नववी ते बारावीसाठी आहे, परंतु आता केवळ नववीच्या वर्गासाठीच अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • ही शाळा दिल्ली शिक्षण मंडळाकडून मान्यता प्राप्त आहे.

  • 8 वी उत्तीर्ण झालेले 13 ते 18 वर्षांचे कोणतेही मूल अर्ज करू शकणार आहेत.

  • अर्ज करण्यासाठी, तुम्हाला DMVS.ac.in ला भेट द्यावी लागेल.